ते 200 कि.मी चा पायी प्रवास करुन घर गाठायला आले पण... 

Home Corentyne detained in Mandangad from detachment centers
Home Corentyne detained in Mandangad from detachment centers

मंडणगड - कोरोनाच्या भीती व लॉकडाऊनमुळे सारेच ठप्प असल्याने मुंबईत राहणारे तालुक्यातील चाकरमानी पुरते हवालदिल झाले. मुंबईत कामधंदा नसल्याने अनेकजण तर २०० कि.मी.चा पायी प्रवास करून गावी आपले घर गाठण्यासाठी आले होते. परंतु या साऱ्यांना तालुक्याच्या प्रवेश व्दाराजवळ अडवून त्यांना विलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते. ता.६ एप्रिलपर्यंत तालुक्यात दाखल झालेल्या ७२ नागरीकांपैकी ता.१ व २ एप्रिल रोजी ताब्यात घेण्यात आलेल्या ४० नागरीकांना वैद्यकीय तपासणी पूर्ण केल्यानंतर त्यांच्या घरी सोडण्यात आले आहे. या सर्व नागरीकांच्या हातावर होम कोरंटाईनचे शिक्के मारण्यात आले असून त्यांना पूढील चौदा दिवस घरातच राहण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत. त्यामुळे आता ३२ नागरीक विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहेत.

७० कुटुंबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

लाॅकडाऊनमुळे संपूर्ण तालुक्यातील बेघर मजुरांची उपासमार होत असल्याने तालुका महसुल प्रशासन, दापोली अर्बन बँक व दानशूर व्यक्तींनी मदतीचा हात पुढे करत त्यांना जीवनावश्यक वस्तुचे वाटप करण्यात आले. नुकतेच तहसीलदार नारायण वेंगुर्लेकर आणि त्यांच्या टिमने तालुक्यातील ७० कुटुंब त्यातील सुमारे २४०० नागरीकांना ५ किलो तांदूळ, तेल पिशवी, तिखट,मिठ, कांदे, बटाटे, डाळ इ. प्रकारचे जिवनावष्यक वस्तुंचे वाटप केले. यामुळे या कुटुंबाचे पुढील आठ दिवसांकरीता अन्नाची वणवण थांबणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com