होमगार्डने वाचविले रेल्वेत चढताना पडलेल्या महिलेचे प्राण 

होमगार्डने वाचविले रेल्वेत चढताना पडलेल्या महिलेचे प्राण 

रत्नागिरी - खेड रेल्वे स्टेशनवर चालत्या गाडीत चढण्याच्या प्रयत्नात एक महिला फलाटवर कोसळली. परंतु प्रसंगावधान साधत त्यावेळी स्टेशनवर असलेल्या होमगार्ड जवानांनी महिलेचे प्राण वाचवले.

सिद्धि पाळेकर ( देवगड, जि. सिंधुदुर्ग) असे या महिलेचे नाव आहे. त्या दादर सावंतवाडी रेल्वेतून प्रवास करीत होत्या. ही गाडी खेड रेल्वे स्थानकात आली असता पालेकर या स्टेशनवर उतरल्या. परंतु गाडी सुरू झाली. धावत्या गाडीत त्यांनी चढण्याचा प्रयत्न केला. या गडबडीत त्या खाली पडल्या व घसरत गेल्याने फलाट व गाडीमध्ये त्यांचा पाय अडकला. त्यावेळी सेवा बजावत असलेले होमगार्डचे जवान संजय कडू, उदय मोरे, जनार्दन पाष्टे व रेल्वेचे पोलीस तेजपाल सिंह यांच्या हा प्रकार लक्षात आला. त्यानी क्षणाचाही विलंब न लावता आपला जीव धोक्यात घालून त्या महिलेकडे धाव घेतली. तिला पटकन बाहेर खेचले. यामुळे त्या महिलेचे प्राण वाचले. या अपघातामध्ये ही महिला किरकोळ जखमी झाली तर होमगार्ड जवान कडू यांना देखील किरकोळ दुखापत झाली आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com