महाराष्ट्रातील नाट्यरसिक व कलाकारांना मेजवाणी

अमित गवळे
रविवार, 2 डिसेंबर 2018

पाली : प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने पालीत येत्या १८ तारखेपासून राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा रंगणार आहेत. हे या स्पर्धेचे १० वे वर्ष आहे. येथील ग. बा. वडेर हायस्कुल पालीच्या भव्य रंगमंचावर या स्पर्धा होणार आहेत.

पाली : प्रकाश देसाई सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठानच्यावतीने पालीत येत्या १८ तारखेपासून राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा रंगणार आहेत. हे या स्पर्धेचे १० वे वर्ष आहे. येथील ग. बा. वडेर हायस्कुल पालीच्या भव्य रंगमंचावर या स्पर्धा होणार आहेत.

स्पर्धेच्या उद्घाघटनास सिने अभिनेते प्रियदर्शन जाधव उपस्थित असणार आहेत. तर या स्पर्धेचा समारोप व बक्षिस समारंभ २४ डिसेंबरला होणार आहे. समारोपावेळी ‘’सही रे सही’’ हे प्रसिद्ध नाटक नाट्यरसिकांना पाहण्यासाठी मोफत असणार आहे. हि स्पर्धा म्हणजे महाराष्ट्रातील नाट्य रसिकांसाठी पर्वणी असते. तसेच होतकरु अाणि दिग्गज कलाकारांना या स्पर्धेच्या माध्यमातून नाट्य कलाविष्काराची आगळीवेगळी संधी मिळते. नवोदीत व तरुण रंगकर्मीं या एकांकिकांमध्ये आपली दमदार कामगिरी सादर करतात. त्यांची कला हेरण्यासाठी नाट्यनिर्माते आणि टिव्ही मालिकांचे दिग्दर्शकांसह हजारो नाट्यप्रेमी प्रेक्षक एकांकिका स्पर्धेत हजेरी लावतात. पालीतील स्पर्धेत सादरीकरण करणाऱ्या कलाकारांनी पुढे अनेक टिव्ही मालिका व चित्रपट सृष्टीत पदार्पण करुन आपल्या प्रतिभेने अभिनय क्षेत्रात छाप पाडली आहे. अशी माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष वेत्रवान गुरव यांनी दिली.

या स्पर्धेत मुंबई, ठाणे, पुणे, कोकण, इत्यादींसह राज्यातील तसेच गोवा अाणि इतर राज्यातील एकांकिका संघ व स्पर्धक देखील सहभागी होतात. एकांकिका स्पर्धेत सांघिक प्रथम क्रमांक पटकाविणार्‍या एकांकिका संघाला ३० हजार रुपये, द्वितीय क्रमांकास ३० हजार रुपये, तृतीय क्रमांकास २० हजार रुपये, चतुर्थ क्रमांकास १० हजार रुपये व आकर्षक चषक देवून गौरविण्यात येणार आहे. रायगड जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट सादरीकरण करणार्‍या एकांकिका संघाला स्वतंत्रपणे १० हजार रुपये व आकर्षक चषक देवून गौरविण्यात येणार आहे. तसेच वैयक्तिक अभिनयाकरीता देखील प्रोत्साहनपर पारितोषिक दिली जाणार आहेत. अधिक माहितीसाठी वेत्रवान गुरव 9420319496, 9028592090, अभिजीत चांदोरकर, 8983713769 यांच्याशी संपर्क साधावा.

Web Title: Hostels of theater and artists in Maharashtra