रत्नागिरीत हॉटेल व्यवसायिकांना पुन्हा खंडणीच्या धमक्या

राजेश कळंबटे
Sunday, 1 November 2020

खंडणी देण्यास  विरोध केल्यावर शिवीगाळ जीवे मारण्याची धमकीही दिली.

रत्नागिरी : काही महिन्यांपूर्वी रत्नागिरी शहरातील आठवडा बाजार येथील मोबाईल व्यावसायिकाला खंडणीवरून जीवे मारण्याचा प्रयत्न नागरिकांच्या स्मरणात असतानाच पुन्हा एकदा याच भागातील हॉटेल व्यावसायिकांकडून खंडणी मागण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. आठवडा बाजार येथील हॉटेल गणेशच्या मालकांना दोघांनी धमकी देत आठवड्याला पाच हजारांच्या खंडणीची मागणी केली. या प्रकरणी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा - जिल्हा परिषदतेतील रिक्त पदे भरण्यासाठी लवकरच शासनस्तरावर मंजुरी -

'तुला व्यवसाय करायचा असेल तर आठवड्याला पाच हजारांची खंडणी दे, नाहीतर तू, तुझा भाऊ आणि तुझ्या कामगारांना सोडणार नाही. अशी धमकी देत शनिवारी आठवडा बाजार येथील हॉटेल गणेश मध्ये घुसले. खंडणी देण्यास  विरोध केल्यावर शिवीगाळ जीवे मारण्याची धमकीही दिली. त्याच बरोबर हॅाटेल मधील स्टाफला काम न करण्याची धमकी  दिली. भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली.  

या प्रकरणी हॉटेल मालक ऋषिकेश कुलकर्णी यांनी फिर्याद दिल्यानंतर शहर पोलीस स्थानकात मनोज तांडेल आणि आशु सावंत या दोघांवर भा. द. वि. कलम 387 नुसार शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिकचा तपास शहर पोलीस करत आहेत. 

हेही वाचा - गोवळ जमीन घोटाळा प्रकरणी राजापूर दुय्यम निबंधकांच्या चौकशीचे आदेश -

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hotel business man threat for ransom in ratnagiri athavada bajar