चिपळुणात घराला भीषण आग,लाखोंचे नुकसान

चिपळूण शहरातील पाग येथील एका घराला लागलेली आग विझवताना अग्निशमन दलाचे कर्मचारी
House fire in Chiplun
House fire in Chiplunsakal

चिपळूण : शहरातील भाग येथील गोपाळकृष्णवाडी येथे शुक्रवारी सकाळी 11 वाजता घराला भीषण आग लागून मंडपाच्या साहित्यासह लाखो रुपयांचे नुकसान झाले. नगर परिषदेच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग नियंत्रणात आणली. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

पाग गोपाळकृष्णवाडी येथील मुंबई स्थित असलेल्या अरुण भालेकर यांच्या भीमाशेठ निवासस्थानात त्यांचे नातेवाईक असलेले पाच कुटुंबीय राहत होते. वसंत भोजने, पांडुरंग भोजने, शशिकांत भोजने, निलेश भोजने व विजय भोजने असे पाच कुटुंबीय या निवासस्थानी चार वर्षांपासून राहताहेत. अशातच शुक्रवारी सकाळी घरातील सर्वजण कामानिमित्त बाहेर गेले असताना ही घटना घडली. यावेळी भोजने यांच्या आई लक्ष्मी भोजने एकट्याच घरी होत्या.

मात्र अचानक शॉर्टसर्किट होऊन घराला आग लागली. लाग लागल्याचे लक्षात येताच शेजाऱ्यांनी धाव घेत लक्ष्मी भोजने यांना घराबाहेर काढले. त्यानंतर काहीवेळातच आगीने रौद्ररूप धारण केले आणि एका रूममधील सिलेंडरचा स्फोट झाला. त्यामुळे लागलेल्या भीषण आगीत संपूर्ण घर भस्मसात झाले.यावेळी नगर परिषद अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी पोहचून आग नियंत्रणात आणली. या आगीत निलेश भोजने यांच्या मंडपाच्या साहित्याचे व घरातील कपडे व अन्य साहित्य जळून खाक झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com