चिमुकल्यांनी कशी केली कोरोना संसर्गावर मात.....सांगताहेत डाॅ. दिलीप मोरे

How infants overcome Corona infection
How infants overcome Corona infection

रत्नागिरी : नाकापासून फुफ्फुसापर्यंत श्‍वसननलिका असते. त्यातील रिसेप्टरमध्ये कोरोना विषाणू चिकटून बसतो आणि फैलाव होतो. मोठ्या माणसांमध्ये रिसेप्टरची संख्या जास्त असते. मात्र लहान मुलांमध्ये याची संख्या कमी असते. त्यामुळे त्याचा फैलाव कमी प्रमाणात होतो. आईच्या सानिध्यात मुल राहिल्याने मानसिकता सुदृढ होते. स्तनपानामुळे प्रतिकारक्षमता वाढते. मुल दाखल झालेल्यांची हिस्ट्री, औषधोपचारामधील पाठपुरावा केल्यामुळेच 32 चिमुकल्यांनी कोरोनावर विजय मिळविला, अशी माहिती बाल रोगतज्ज्ञ  डॉ. दिलीप मोरे यांनी "सकाळ'ला दिली. 

जिल्हा रुग्णालयात 100 दिवसांमध्ये 32 मुलांनी कोरोनावर मात केली. त्यामध्ये कोरोना पॉझिटीव्ह माता आणि बालकांचाही समावेश आहे. मुलांची आणि मातांची काळजी घेतल्यामुळे एकही मूल दगावले नाही, याचे इंगित जाणून घेतले. डॉ. मोरे म्हणाले, ``कोणताही रुग्ण दाखल झाला की त्याच्या प्रवासाचा इतिहास महत्त्वाचा असतो. त्यावर प्रादुर्भावाचा अंदाज लावून पुढील उपचार सुरू केला जातो. मेडिकल प्रोटोकॉल पाळूनच उपचार पद्धती किंवा डोस दिले जातात. प्रत्येकाची लक्षणे वेगळी असतात. त्यामध्ये ताप, ताप-खोकला, ताप-दमा, आकडीचा प्रकार अशी लक्षणे असतात. त्यानुसार उपचार पद्धती ठरविले जाते. डिस्चार्ज देण्यात आलेल्या माता आणि बाळांना कोरोना होता. मात्र मातेच्या स्तनपानातून हा व्हायरस जात नाही. स्तनपान करताना योग्य ती खबरदारी घेऊन मुलांना दूध पाजले जाते.`` 

लहान मुलांची प्रतिकारक्षमता आईच्या दुधामुळेच वाढते. त्यात मुल आईच्या सानिध्यात राहिल्यास त्याची मानसिकता सुदृढ होते. इन्फेक्‍शन वाढण्याची भिती कमी असते. मुल आईपासून दूर ठेवल्यास ते अस्वस्थ होते. रडून-रडून त्याची प्रतिकारक्षमता कमी होते. लहान बाळांना कोणते आजार नसतात. नाकापासून फुफ्फुसापर्यंत जाणाऱ्या श्‍वसन नलिकेतील रिसेप्टरमध्ये कोरोना व्हायरस चिकटून बसून त्याचा फैलाव होतो. लहान मुलांमध्ये याची संख्या कमी असते. त्यामुळे 10 दिवसात त्यांना डिस्चार्ज देणे शक्‍य होते. जिल्हा रुग्णालयात गेल्या साडेतीन महिन्यात दाखल झालेल्या कोरोनाबाधित मुलं आणि मातांवरील औषध उपचारामध्ये सातत्याने पाठपुरावा केल्यानेच कोरोनावर मात करू शकले, असेही ते म्हणाले.

85 टक्के लोकांनामध्ये लक्षणे नाहीत
कोरोनाची लक्षणे 85 टक्के लोकांनामध्ये दिसत नाहीत. त्यांना कोणताही त्रास होत नाही. रुग्ण बरा होऊन गेलेलेही समजत नाही. 12 टक्के लोकांमध्ये लक्षणे दिसतात. तर 3 ते 5 टक्के लोकांमध्ये कोरोनाची तीव्रता वाढललेली दिसते. त्यांना व्हेंन्टिलेटरची गरज भासते. जिल्हा रुग्णालयात अपेक्षित व्हेन्टिलेटर उपलब्ध आहेत, असेही डॉ. मोरे यांनी सांगितले. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com