बारावीची परीक्षा आजपासून 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 फेब्रुवारी 2017

जिल्ह्यात ३४ हजार ९३७ विद्यार्थी 
अलिबाग - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा मंगळवारपासून (ता. २८) सुरू होत आहे. जिल्ह्यातील ३९ परीक्षा केंद्रांवर ३४ हजार ९८७ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. 

जिल्ह्यात ३४ हजार ९३७ विद्यार्थी 
अलिबाग - महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाची बारावीची परीक्षा मंगळवारपासून (ता. २८) सुरू होत आहे. जिल्ह्यातील ३९ परीक्षा केंद्रांवर ३४ हजार ९८७ विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. 

परीक्षा सुरळीत पार पाडण्यासाठी शिक्षण विभागाने योग्य ती तयारी केली आहे. परीक्षा केंद्रांवर पोलिस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. २५ मार्चपर्यंत ही परीक्षा चालणार आहे. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर अर्धा तास आधी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांना आसनव्यवस्था शोधण्यात अडचण निर्माण होऊ नये, यासाठी केंद्राबाहेर फलक लावण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षा केंद्रावर मोबाईल फोन आणू नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

प्रत्येक परीक्षा केंद्रावर केंद्रसंचालकांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक वर्गात पर्यवेक्षक राहणार आहेत. त्यांच्या जोडीला कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. गेल्या वर्षी बारावीला ३३ हजार ८८३ विद्यार्थी बसले होते. ही परीक्षा जिल्ह्यातील ३७ केंद्रांवर घेण्यात आली होती. या वर्षी विद्यार्थीसंख्या १,१०४ ने वाढली आहे. जिल्ह्यात दोन परीक्षा केंद्रे वाढली आहेत. 

पाच भरारी पथके 
विद्यार्थ्यांनी कॉपी करू नये यासाठी शिक्षण विभागाने मोठी खबरदारी घेतली आहे. जिल्हाभरात पाच भरारी पथकांची निर्मिती करण्यात आली आहे. या पथकांचे नेतृत्व माध्यमिक शिक्षण विभागाचे अधिकारी, माध्यामिक उप-शिक्षण अधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग अधिकारी, प्राथमिक उप-शिक्षण अधिकारी, डाएट प्राचार्य, निरंतर शिक्षण अधिकारी करणार आहेत. पथकांमध्ये शिक्षण विभागातील कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. याव्यतिरिक्त तालुकास्तरावर तहसीलदार, गटविकास अधिकारी, गटशिक्षण अधिकारी परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पाहणी करणार आहेत.

शाखानिहाय विद्यार्थी 
  विज्ञान- ११ हजार ४७९    वाणिज्य- १२ हजार ४१० 
  कला- १० हजार ११७      किमान कौशल्य- ९८१

Web Title: HSC exams start today