आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी गर्दी

आंबोलीत वर्षा पर्यटनासाठी गर्दी

आंबोली -  वर्षा पर्यटनासाठी आज आंबोली येथे सर्वाधिक गर्दी झालेली पाहायला मिळाली. घाटाला जत्रेचे स्वरूप आले होते. पोलिसांच्या चोख नियोजनामुळे वाहतूक कोंडी झाली नाही. 

आंबोली येथील धबधब्याच्या ठिकाणी गेल्या दहा वर्षापासून वर्षा पर्यटनासाठी गर्दी होत आहे. पावसाळा सुरू झाला की तरूणाईला ओढ लागते ती धबधब्यात चिंब भिजण्याची, डुंबण्याची तसेच गार हवेत मनसोक्त विहारण्याची. हीच मजा घेण्यासाठी पावसात लाखो पर्यटक आंबोलीत दाखल होतात. त्यात शनिवार रविवार सुट्टीचा दिवस असल्याने आंबोलीत मोठी गर्दी होते,

हजारो पर्यटकांची रेलचेल येथे सूरु होते. यावर्षीच्या गर्दीत आजची रविवारची गर्दी सर्वाधिक होती. एक ऑगस्टपासून श्रावण सुरू होत असल्याने मोठी गर्दी येथे पहावयास मिळाली. गोवा, कर्नाटक या राज्यांसह पश्चिम महाराष्ट्र, कोकण, पुणे, मुंबई येथील पर्यटकांची गर्दी येथे झालेली दिसून आली.

शनिवारी येथील सर्व हॉटेल्स फुल्ल झालेली होती. काही पर्यटक येताना पार्टीसाठी जेवण घेऊन येताना दिसून आले. कौटुंबिक पर्यटकांची संख्या देखील बऱ्यापैकी होती. स्थानिक स्टॉलधारकांचा देखील मोठा व्यवसाय झाला. येथे कर आकारणी होत नसल्याने पर्यटकांनी देखील समाधान व्यक्त केले.

येथील कावळेसाद आणि हिरण्यकेशी पॉईंटवर देखील मोठी गर्दी पर्यटकांनी केली. हिरण्यकेशी येथे तळीत पर्यटक डुंबताना दिसत होते. तर कावळेसाद येथे नदीच्या पाण्यात डुंबत होते. वाऱ्यावर  उडणाऱ्या तुषारांचा देखील पर्यटक मनसोक्त आनंद लुटत होते.  

आंबोलीत चौकूळ रस्त्याला पर्यटकांच्या गाड्या पार्किंग करून ठेऊन ३ किलोमीटर पर्यंत चालत पर्यटकाना जावे लागत होते त्यामुळे घाटातील रस्ते भविकांप्रमाणे धबधब्यापर्यंत गर्दीने फुलून गेले होते. याठिकाणी पोलीस निरीक्षक सुनील धनावडे, वाहतूक निरीक्षक  अविनाश भोसले तसेच ८ अधिकारी आणि ९० पोलीस ९५ होमगार्ड असे मिळून २०० जणांचा बंदोबस्त होता. रस्त्यावर ठिकठिकाणी वाहतूक नियंत्रणासाठी पोलिसांनी शिस्तबद्ध नियोजन केले. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि हुल्लडबाजीला आळा बसला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com