चारित्र्याचा संशयावरून सरपंच सोनाली जाधव यांचा खून

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

सोनाली दीपक जाधव असे महिलेचे नाव असून कादवड गावच्या त्या सरपंच होत्या. पहाटे तीनच्या सुमारास पती दीपक जाधव यांनी पत्नीला शिवीगाळ करीत घराशेजारील चिरा (जांभा दगड) घेऊन पत्नीच्या डोक्यात घातला. यात सरपंच सोनाली जाधव यांचा मृत्यू झाला.

चिपळूण : चारित्र्यावरून संशय घेत पतीने कादवड गावच्या सरपंच पत्नीचा खून केल्याची घटना तालुक्यातील कादवड येथे घडली.

सोनाली दीपक जाधव असे महिलेचे नाव असून कादवड गावच्या त्या सरपंच होत्या. पहाटे तीनच्या सुमारास पती दीपक जाधव यांनी पत्नीला शिवीगाळ करीत घराशेजारील चिरा (जांभा दगड) घेऊन पत्नीच्या डोक्यात घातला. यात सरपंच सोनाली जाधव यांचा मृत्यू झाला.

या घटनेची फिर्याद मुलगी किरण दीपक जाधव हिने शिरगाव पोलिस ठाण्यात दिली. संशयित पतीला शिरगाव पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अधिक तपास पोलिस निरीक्षक निशा जाधव करीत आहेत. कादवड ग्रामपंचायतीत सरपंचपद आरक्षित असल्याने तीन वर्षापूर्वी सोनाली जाधव यांची सरपंचपदी वर्णी लावली होती. 

Web Title: husband killed wife in Chiplun