अब्रू लुटण्याची धमकी देत महिलेसह तिच्या भावाला मारहाण

अमित गवळे
मंगळवार, 1 मे 2018

पाली : पुरोगामी महाराष्ट्रात महिलांवरील अन्याय अत्याचार वाढतच अाहेत. पालीसारख्या छोट्या गावात एका विवाहीत महिलेसह तिच्या भावाला न्यायालय व पोलीस स्थानकाच्या परिसरात शिविगाळ व दमदाटी करुन बेदम मारहाण करण्यात आली. त्याबरोबरच चक्क अब्रु लुटण्याची धमकीदेखील या महिलेला देण्यात आली. ही घटना काल (सोमवार) सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास घडली.

पती विरोधात रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक (महिला विभाग) यांच्याकडे तक्रार केल्याच्या रागावरुन पतीने तिघा साथीदारांकरवी मारहाण केली असल्याचा आरोप सदर महिलेने केला आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की सुधागड तालुक्यातील नेणवली येथील तक्रारदार महिलेने तिच्या पतीविरोधात रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक (महिला विभाग) यांच्याकडे काही दिवसांपुर्वी तक्रार दिली होती. या अर्जाच्या संदर्भानुसार महिला व तिचा भाऊ पाली पोलीस स्थानकांत तक्रार देण्यासाठी काल (सोमवार) सायंकाळी येत असतांना पाली तहसील कार्यालय रोडवर नितेश (पूर्ण नाव कळाले नाही), निलेश जाधव तसेच तुकाराम खैरे यांनी महिला व तिचा भाऊ नितेश ठाकूर याला अडवून मारहाण केली. 

महिलेच्या भावाला जवळच्या विजेच्या खांबावर आपटले. यामध्ये त्याच्या डोक्याला दुखापत होऊन रक्त वाहू लागले. याचवेळी सदर महिलेलादेखील हाताने मारहाण केली. सबंधित आरोपी एवढ्यावरच न थांबता त्यांनी या महिलेला अब्रु लुटण्याची धमकी दिली आणि तेथून पोबारा केला. 

हा प्रकार ज्या जागेवर घडला तेथे हाकेच्या अंतरावर पोलीस स्थानक, न्यायालय व तहसिल कार्यालय अाहे. या संदर्भात पाली पोलीस स्थानकांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरिक्षक दशरथ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक महेश लांगी हे करीत आहेत.

Web Title: husband with three others beat wife and her brother near police station