आय लॉगचा प्रकल्प अहवाल खोटा

आय लॉगचा प्रकल्प अहवाल खोटा

रत्नागिरी - आय लॉग पोर्टस्‌ प्रा. लि. कंपनीचा प्रकल्प अहवाल खोटा आहे. कोणताही औष्णिक प्रकल्प उभारणार नसल्याचे कालच कंपनीने स्पष्ट केले. मात्र वारंवार होणारे भारनियमन आणि आयात केलेल्या कोळशाचा वापर करून औष्णिक वीज केंद्र उभारणे हा एकमेव पर्याय, असे प्रकल्प अहवालात म्हटले आहे.

नाणार प्रकल्प काही अंतरावर आहे. तरी २५ किमीवर परिसरात कोणताही दुसरा उद्योग नसल्याचे अहवालात धडधडीत खोटे म्हटल्याचे पुराव्यानिशी दाखवून नाटे मच्छीमारांनी पत्रकार परिषदेत कंपनीच्या अहवालाचा पंचनामा केला.  

मच्छीमारांचा उल्लेख नाही
नाटे येथील बंदरामध्ये दरवर्षी सुमारे १९ हजार टनावर मासेमारी केली जाते. एवढी मोठी आर्थिक उलाढाल आणि रोजगार देणारा हा भाग आहे. मात्र, कंपनीच्या प्रकल्प अहवालामध्ये मच्छीमारांचा कुठेही उल्लेख नाही.

यावेळी मच्छीमार व सरपंच नौशाद धालावेलकर, अमजत बोरकर, सुनील खानविलकर, अलिमिया म्हसकर, आदिल म्हसकर, मानसूर सोलकर आदी उपस्थित होते. 

ते म्हणाले, ‘आय लॉग कंपनीने दिलेला प्रकल्प अहवाल आणि कंपनीने केलेल्या स्पष्टीकरण वस्तुस्थितीला धरून नाही. आय लॉग पोर्टस्‌ कंपनीचा कोणताही औष्णिक प्रकल्प, शुगर फॅक्‍टरी  किंवा बॉक्‍साईटचा प्रकल्प नाही, असे कालच स्पष्ट केले. मात्र कंपनी हे फक्त बंदर असल्याचे भासवीत असून औष्णिक प्रकल्प किंवा बॉक्‍साईट शुद्धीकरणाचा प्रकल्प उभारण्याचा घाट घातला आहे.  

बंदरात १ कोटी टन कार्गो येणार आहे. मोठ्या प्रमाणात येणाऱ्या दगडी कोळशाचा उपयोग कंपनी औष्णिक प्रकल्पासाठी करणार आहे. वारंवार भारनियमन होते. त्यामुळे आयात केलेल्या कोळशाचा वापर करून औष्णिक वीज केंद्र उभारणे हा एकमेव पर्याय, असे अहवालात म्हटले आहे. कॅप्टीव्ह जेटी म्हणजे मोठ्या परियोजनेचा हा भाग आहे.

भविष्यातील मोठ्या प्रकल्पाचे धोरण डोळ्यासमोर ठेवून ते उभारले जात आहे. त्या परिसरातील ग्रामपंचायतींनी प्रकल्पाला कोणताही ना हरकत दाखला दिलेला नाही. दोन ते तीन वेळा प्रकल्प अहवाल बदलून आणि सुनावणी घेऊनही ती अपयशी ठरली, तरी कंपनी स्थानिकांचे समाधान करू शकलेली नाही. प्रचंड विसंगती असल्याने प्रकल्पाला आमचा विरोध आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com