जि. प. चे आदर्श शाळा पुरस्कार जाहीर

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 फेब्रुवारी 2019

रत्नागिरी - जिल्हा परिषद शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा, यासाठी शिक्षण विभागाकडून आदर्श शाळा पुरस्कार दिला जातो. २०१८-१९ मधील पुरस्कारप्राप्त १८ शाळांची नावे शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांनी जाहीर केली. कनिष्ठ आणि वरिष्ठ प्राथमिक शाळा अशा दोन गटांत प्रत्येक तालुक्‍याला दोन पुरस्कार देण्यात येणार आहेत. पुरस्कारप्राप्त शाळांना प्रशस्तीपत्र, सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे. यामुळे शाळांमध्ये दर्जा सुधारण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

पुरस्कारासाठी जिल्ह्यातून ४७ प्रस्ताव दाखल केले होते. त्याची तपासणी करून पुरस्कारप्राप्त शाळा निवडण्यासाठी शिक्षण सभापती सहदेव बेटकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. 
त्यामध्ये ही निवड केली. त्यात (अनुक्रमे कनिष्ठ, वरिष्ठ) मंडणगड तालुक्‍यात जि. प. प्राथमिक शाळा तळेघर, पाले क्र. १, दापोली- आसूद रेवाळेवाडी, निगडे शाळा. खेड- सवणस घोणसवणे, दयाळ क्र. १. चिपळूण- दहिवली बु. क्र. १, निवळी क्र. १. गुहागर- पांगारी सडेवाडी, वेळणेश्‍वर क्र. १. संगमेश्‍वर- शेनवडे शाळा, धामापूर क्र. ४. रत्नागिरी- कळझोंडी क्र. १, वाटद मिरवणे. लांजा- रिंगणे क्र. १, पन्हळे क्र. १. राजापूर- कोंडसूर खुर्द क्र. २, करक शाळा क्र. ३. त्याचबरोबर संगमेश्‍वर तालुक्‍यातील माभळे-जाधववाडी शाळा आणि घाटीवळे कदमवाडी शाळेला विशेष पुरस्कार जाहीर झाला आहे. वरिष्ठ शाळांना १ हजार रुपये, प्रशस्तिपत्र, सन्मानचिन्ह, तर कनिष्ठ शाळांना ५०० रुपये प्रशस्तिपत्र आणि सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार आहे.

२ मार्चला वितरण
पारितोषिक वितरण जिल्हा परिषद अध्यक्षा स्वरूपा साळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, शिक्षण सभापती सहदेव बेटकर, शिक्षणाधिकारी देवीदास कुलाळ यांच्या हस्ते २ मार्चला सकाळी ११ वाजता शामराव पेजे सभागृहात होणार असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने दिली.

Web Title: ideal school award to Zhila Parishad