महागाईला आळा घालण्यास युती अपयशी

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 7 मार्च 2017

कणकवली - महागाईला आळा घालण्यास केंद्रातील आणि राज्यातील युती सरकार पूर्णतः अपयशी ठरले आहे. पेट्रोल, डिझेलबरोबरच घरगुती सिलिंडर गॅस महाग झाला आहे. बॅंकिंगच्या व्यवहारांवर कर वसूल केला जाणार आहे. यात महागाईचा भडका उडून सर्वसामान्य त्यात होरपळत आहे. येत्या काही दिवसांत महागाई कमी न झाल्यास मनसे आंदोलन छेडणार असल्याचा इशारा मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी आज दिला.

वाढत्या महागाईचा निषेध करणारे निवेदन मनसेचे जिल्हाध्यक्ष राजन दाभोलकर, महिला जिल्हाध्यक्षा चैताली भेंडे यांच्यासह दया मेस्त्री, समीर आचरेकर आदींनी आज प्रांताधिकारी नीता सावंत-शिंदे यांना दिले. 

निवेदनात म्हटले आहे, की अच्छे दिनाचा वादा करणाऱ्या केंद्र आणि राज्य सरकारने घरगुती वापराच्या सिलिंडरचा दर आठशे रुपयांपर्यंत नेऊन ठेवला आहे. पेट्रोल, डिझेलचेही दर महिन्याला वाढत आहेत. रेशन दुकानांवर बायोमेट्रिक प्रणाली बसविली जाणार आहे; मात्र यात सर्वसामान्यांचे रेशन बंद होणार आहे. घरगुती वापराची वीज बिलेदेखील विविध कर आणि चार्ज लावून दुप्पट करण्यात आली आहेत. त्यामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. केंद्र सरकारने महिन्याला चारपेक्षा अधिक बॅंक व्यवहार करणाऱ्यांना १५० रुपये टॅक्‍स लावणार असल्याचे जाहीर केले आहे. एकूणच सर्व बाजूंनी शेतकरी आणि सर्वसामान्यांची पिळवणूक होत आहे. अच्छे दिन आणणाऱ्या केंद्र व राज्य सरकारने मजूर, शेतमजूर आणि गोरगरिबांचे जिणे मुश्‍कील केले आहे.

शेतकऱ्यांना उत्पादित शेतमालाचाही योग्य दर मिळेनासा झाला आहे. याबाबत केंद्र व राज्य शासनाने वेळीच उपाययोजना करून महागाई नियंत्रणात ठेवावी, अन्यथा आंदोलन करण्यात येणार आहे.

Web Title: If the Alliance fails to prevent inflation