इळये शाळा "सेंद्रिय परसबाग' स्पर्धेत प्रथम 

Ilaye School First In Organic Garden Garden Competition
Ilaye School First In Organic Garden Garden Competition

ओरोस ( सिंधुदुर्ग ) - सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेमार्फत 2018-19 या शैक्षणिक वर्षापासून जिल्हा परिषद शाळांतील विद्यार्थ्यांना शेतकऱ्यांबद्दल आदर निर्माण व्हावा, यासाठी विविध उपक्रम हाती घेतले आहेत. यातीलच एक भाग म्हणून या शाळांसाठी "सेंद्रिय परसबाग' ही स्पर्धा 2019-20 या वर्षासाठी आयोजित केली होती. या स्पर्धेत जिल्हास्तरावर इळये क्रमांक 1 (ता. देवगड) शाळेने प्रथम क्रमांक मिळविला. या शाळेला रोख 10 हजार रूपये व प्रमाणपत्र जिल्हा परिषदेच्यावतीने देण्यात येणार आहे, अशी माहिती शिक्षण सभापती सावी लोके यांनी दिली. 

या स्पर्धेचा तालुकास्तरीय व जिल्हास्तरीय निकाल सभापती लोके यांनी जाहीर केला. या स्पर्धेत इळये नं 1 शाळेने देवगड तालुक्‍यात प्रथम क्रमांक मिळवत जिल्हास्तरावर बाजी मारली आहे. दोडामार्ग तालुक्‍यात शिरंगे पुनर्वसन शाळेने प्रथम क्रमांक मिळविला आहे.

सावंतवाडी तालुक्‍यात आंबेगांव शाळा, कुडाळ तालुक्‍यात पोखरण नं 1 शाळा, वेंगुर्ले तालुक्‍यात श्री वेताळ विद्यामंदिर तुळस, कणकवली तालुक्‍यात तीवरे खालची शाळा, वैभववाडी तालुक्‍यात वि. मं. नाधवडे ब्राम्हणदेव नवलादेवीवाडी शाळा, मालवण तालुक्‍यात श्रावण नं 1 या शाळांनी तालुकानिहाय प्रथम क्रमांक मिळविला आहे. तालुकास्तरावर प्रथम आलेल्या शाळांना रोख अडीज हजार रूपये व प्रमाणपत्र देण्यात येणार आहे, असे यावेळी सौ लोके यांनी सांगितले. 

यावेळी आंबोकर म्हणाले, ""या उपक्रमाला जिल्ह्यातील शिक्षक व विद्यार्थी यांचा मोठा प्रतिसाद लाभला. 25 ते 30 प्रकारच्या भाज्या, फळांचे उत्पादन जिल्ह्यातील शाळांनी घेतले. पपई, केळी, नारळाची चुनकाप, वड्या, कोथिंबीर वड्या, अळुवड्या आदि पदार्थ पिकविलेल्या उत्पादनापासून बनविण्यात आले. यातून झालेल्या आर्थिक फायद्यातून अंडी, मासे, चिकन, मटन विद्यार्थ्यांना अतिरिक्त आहार मिळाला. परिणामी मुलांना स्वकष्टाची सवय लागली. मुलांची उंची, वजन वाढण्यास मदत झाली. हीमोग्लोबिन वाढले. जिल्ह्यात प्रथम आलेल्या इळये नं 1 शाळेने तब्वल 28 हजार 260 रूपये आर्थिक उत्पादन घेतले.''  

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com