esakal | इन्सुलीत ट्रकमधून 33 लाखांची दारू जप्त; कारवाईत 2 जण ताब्यात
sakal

बोलून बातमी शोधा

इन्सुलीत ट्रकमधून 33 लाखांची दारू जप्त; कारवाईत 2 जण ताब्यात

इन्सुलीत ट्रकमधून 33 लाखांची दारू जप्त; कारवाईत 2 जण ताब्यात

sakal_logo
By
टीम ई सकाळ

बांदा : गोव्याहून (goa-mumbai) मुंबईच्या दिशेने मोठ्या ट्रकमधून होणाऱ्या बेकायदा दारू वाहतुकीवर आज राज्य उत्पादन शुल्क खात्याच्या इन्सुली तपासणी नाक्यावर कारवाई केली. त्यातून तब्बल ३३ लाख ६६ हजार रुपये किमतीच्या गोवा बनावटीच्या (goa alchohol) दारूसह एकूण ४२ लाख ९४ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. इन्सुली तपासणी नाका व रत्नागिरी ग्रामीण पथकाने दुपारी दीडच्या सुमारास कारवाई केली. ट्रकच्या हौद्यात विशेष कप्पे करून दारूची खोकी लपवून ठेवली होती. याप्रकरणी इंदोर येथील दोघांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मोठ्या ट्रकमधून गोवा बनावटीच्या दारूची बेकायदा वाहतूक होणार असल्याची माहिती (crimecase) पथकाला मिळाली. त्यानुसार दुपारी इन्सुली तपासणी नाक्यावर इन्सुली व रत्नागिरी ग्रामीण पथकाने सापळा रचला. दीडच्या सुमारास ट्रक (एमपी ०९ जी एफ ६६४७) थांबविण्यात आला. हौद्याची तपासणी केली असता लाकडी फळ्या होत्या. फळ्यांखाली प्लायवूडच्या साहाय्याने दारू वाहतुकीसाठी विशेष कप्पे केले होते. त्यामध्ये गोवा बनावटीच्या २४ हजार प्लास्टिकच्या बाटल्या असलेली एकूण ५०० खोकी रचून ठेवली होती. त्याची किंमत ३३ लाख ६६ हजार रुपये आहे. दारूसह नऊ लाखांचा ट्रक व ३४ हजारांचे इतर साहित्य, असा एकूण ४२ लाख ९४ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला.

हेही वाचा: 'चुकीच्या धोरणामुळे करूळ घाट खचला, 26 जुलैपर्यंत थांबणार नाही'

ही कारवाई जिल्हा अधीक्षक डॉ. एच. बी. तडवी, इन्सुली तपासणी नाक्याचे प्रभारी निरीक्षक शैलेंद्र चव्हाण, दुय्यम निरीक्षक शिवाजी काळे, जवान शिवशंकर मुपडे, रत्नागिरी ग्रामीण पथकाचे दुय्यम निरीक्षक सत्यवान भगत, डी. एस. कालेलकर, एस. एस. धोत्रे यांनी केली. शिवाजी काळे तपास करत आहेत.

loading image