हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 19 जून 2018

सावंतवाडी : कर्नाटक येथील पथकाच्या माध्यमातून दोडामार्ग भागात स्थिरावलेल्या हत्तींना पकडण्यासाठी तात्काळ मोहीम राबवा असे आदेश अर्थ तथा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज प्रधान सचिव विकास खार्गे यांना दिले. दरम्यान हत्तीपासून होणारे नुकसान वाढवून देण्याबाबत तात्काळ प्रस्ताव सादर करण्यात यावा आपण त्याबाबत अमंलबजावणी करू असेही त्यांनी सांगितले. याबाबतची माहिती माजी आमदार तथा भाजपाचे प्रदेश सरचिटणीस राजन तेली यांनी दीली. 

हत्तीपासून होणाऱ्या नुकसानामुळे त्रस्त झालेल्या हेवाळे घाटीवडे व बाबर्डे भागातील लोकांकडुन आंदोलन करण्यात आले होते. यात हत्ती पासून होणारे नुकसान वाढवून देण्यात यावे, हत्तीना तात्काळ पकडण्यात यावे, हत्तींचा प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक असलेले फटाके व इतर साहित्य पुरविण्यात यावे, आपत्कालीन परिस्थितीसाठी वनविभागाकडून मनुष्यबळ पुरविण्यात यावे, शंभर टक्के अनुदानावर सौरकुंपण उभारण्यास परवानगी देण्यात यावी. अशा विविध मागण्या करण्यात आल्या होत्या. या पार्श्वभूमीवर तेली यांनी आज मुनगंटीवार यांची भेट घेतली यावेळी झालेल्या चर्चेत प्रधान सचिव खारगे उपस्थित होते. या बैठकीत मुनगंटीवार यांनी सर्व मागण्या मान्य केल्या. नुकसान भरपाई वाढवून देण्यासंदर्भात आवश्यक असलेला प्रस्ताव कोल्हापूरचे मुख्य संरक्षक पाटील यांना तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत. तसेच मागण्यांबाबत सकारात्मक विचार करण्याचा आश्वासन यावेळी दिले आहे

Web Title: An immediate catch to elephants