पाली - कासारवाडी झाले पाणीदार...

अमित गवळे
गुरुवार, 16 ऑगस्ट 2018

पाली - मागील अनेक वर्षांपासून कासारवाडी गावाला पाणी टंचाई व समस्येला सामोरे जावे लागत होते. मात्र जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येथे नुकतेच नळपाणी योजनेचे उद्घाटन करुन ती कार्यान्वीत करण्यात आली आहे. त्यामूळे गावचा पाणी प्रश्न सुटून गाव पाणीदार झाले आहे.

पाली - मागील अनेक वर्षांपासून कासारवाडी गावाला पाणी टंचाई व समस्येला सामोरे जावे लागत होते. मात्र जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येथे नुकतेच नळपाणी योजनेचे उद्घाटन करुन ती कार्यान्वीत करण्यात आली आहे. त्यामूळे गावचा पाणी प्रश्न सुटून गाव पाणीदार झाले आहे.

शेकाप राजिप सदस्य सुरेशश खैरे यांच्या प्रयत्नातुन नळपाणी योजना मार्गी लागली आहे. त्यामूळे ग्रामस्तांनी शे.का.पक्षाचे आभार मानले. यावेळी सुरेश खैरे म्हणाले की शेतकरी कामगार पक्षाने विकासकामाच्या बाबतीत दिलेला शब्द नेहमीच तंतोतंत पाळला आहे. शे.का.पक्षाच्या माध्यमातून येथील आदिवासीवाड्यांसह खेड्यापाड्यात ऴ वस्त्यांमध्ये विकासाची गंगा आणली आहे. येथील महिला व ग्रामस्तांना पाण्यासाठी उन्हातान्हात पायपीट करून पाणी आणावे लागत होते. आज येथील ग्रामस्तांना नळपाणीयोजनेद्वारे मुबलक पाणी उपलब्द झाले आहे.

या कार्यक्रमास सुरेश खैरे, सिध्देश्वर ग्रुप ग्रामपंचायत सरपंच उमेश यादव, उपसरपंच नथुराम चोरघे , सिध्देश्वर ग्रामपंचायत सर्व सदस्य ,पोलीस पाटील, व कार्यकर्ते प्रमुख पाहुणे उपस्थित होते. यावेळी जेष्ठ नागरिकांचा सत्कार करण्यात आला. तसेच या कार्यक्रमा अंतर्गत सिध्देश्वर ग्रामपंचायत तर्फे वृक्षारोपणचा कार्यक्रम करण्यात आला. या कार्यक्रमात कवी उमेश जाधव यांनी पर्यावरण विषयावर कविता सादर करून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक हरीचंद्र मालुसरे यांनी केले. सुत्रसंचालन ह. भ. प सुरेशमहाराज पातेरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाची धुरा ग्रामस्थ मंडळ व नवतरुण मित्र मंडळ कासारवाडी यांनी सांभाळली.

Web Title: inaugaration of water tank in kasarwadi