सावंतवाडीत सकाळ रिलीफ फंडातून ओढा खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ

विजय मोरे
शनिवार, 5 मे 2018

उंडवडी- सावंतवाडी (ता. बारामती) येथे 'पाणी फाउंडेशन' उपक्रमाअंतर्गत अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व  बारामती अॅग्रो तसेच सकाळ रिलीफ फंडाच्या वतीने ओढा खोलीकरणाच्या कामासाठी पोकलेन मशीन व त्यासाठी लागणारे इंधन देण्यात आले आहे. या कामाचा शुभारंभ अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. 

उंडवडी- सावंतवाडी (ता. बारामती) येथे 'पाणी फाउंडेशन' उपक्रमाअंतर्गत अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट व  बारामती अॅग्रो तसेच सकाळ रिलीफ फंडाच्या वतीने ओढा खोलीकरणाच्या कामासाठी पोकलेन मशीन व त्यासाठी लागणारे इंधन देण्यात आले आहे. या कामाचा शुभारंभ अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार यांच्या हस्ते करण्यात आला. 

यावेळी अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे प्रकल्प अधिकारी सचिन खलाटे, माजी उपसरपंच शरद सावंत, विक्रम सावंत, उद्योजक रोहिदास सावंत, कैलास सावंत, सुरज सावंत, विजय सावंत, सूर्यकांत सावंत, तुकाराम सावंत, बबन सावंत, गणेश सावंत, तात्यासो सावंत, बाळासो सावंत, अरुण आलगुडे, नवनाथ सावंत, सत्यभामा सावंत, नीलकमल सावंत, इंदूबाई आलगुडे, सारिका सावंत, स्नेहल सावंत, सोनाबाई सावंत, कलावती सावंत, सुषमा सावंत, कावेरी भापकर आदींसह शेतकरी उपस्थित होते.

गोजुबावी (ता. बारामती) हद्दीतील महसुली स्वतंत्र असलेल्या सावंतवाडी या गावाने यंदा पाणी फाउंडेशन सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेत भाग घेतला आहे. त्यानुसार येथे 8 एप्रिलपासून विविध जलसंधारणाची कामे सुरु करण्यात आली आहेत. येथील कुरण ओढ्याचे खोलीकरण करण्यात यावे, यासाठी येथील ग्रामस्थांनी व तनिष्का व्यासपीठाच्या वतीने बारामती अॅग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी व जिल्हा परिषदेचे सदस्य रोहित पवार,अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त सुनंदा पवार तसेच सकाळ रिलीफ फंडाकडे पोकलेन मशीन व डिझेल मिळावे, यासाठी पाठपुरावा केला होता. 

त्यानुसार येथील ओढा खोलीकरणाच्या कामासाठी बारामती अॅग्रो व अॅग्रिकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट यांच्या वतीने पोकलेन मशिन देण्यात आले आहे. या पोकलेन मशिनला सकाळ रिलीफ फंडातून दोन लाखाचे डिझेल देण्यात येत आहे.

यावेळी झालेल्या कार्यक्रमात सुनंदा पवार म्हणाल्या, ''शेतकऱ्यांनी एकत्रित येवून जलसंधारणाची कामे प्रभावीपणे केली पाहिजेत. या कामाचा सर्वाना भविष्यात मोठा फायदा होणार आहे. पानी फाउंडेशन उपक्रमात सहभागी गावानी तातडीने आपल्या जमिनीतील मातीचे परीक्षण करून घ्यावे, यासाठी बारामती कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने अल्प दरात माती परिक्षण करून दिले जाणार आहे. याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. ''
 

Web Title: Inauguration of the work done by the Sakal Relief Fund in Sawantwadi