नोटबंदीनंतर कॅशलेस वीज ग्राहकात वाढ

भूषण आरोसकर : सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 जानेवारी 2017

सावंतवाडी - केंद्राच्या नोटाबंदीनंतर जिल्ह्यात महावितरणच्या ग्राहकांनी बिल भरण्यासाठी कॅशलेश पद्घतीचा वापर वाढविल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात 2 लाख 98 हजार 153 ग्राहकांपैकी 20 हजार 651 ग्राहकांनी या डिसेंबर महिन्यात कॅशलेश पद्धतीने वीज बिले भरली.

सावंतवाडी - केंद्राच्या नोटाबंदीनंतर जिल्ह्यात महावितरणच्या ग्राहकांनी बिल भरण्यासाठी कॅशलेश पद्घतीचा वापर वाढविल्याचे चित्र आहे. जिल्ह्यात 2 लाख 98 हजार 153 ग्राहकांपैकी 20 हजार 651 ग्राहकांनी या डिसेंबर महिन्यात कॅशलेश पद्धतीने वीज बिले भरली.

केंद्राने 8 नोव्हेंबरला नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. यामुळे चलनाअभावी सर्वांनाच आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागले. यावर उपाय म्हणून ग्राहकांनी कॅशलेश पद्धतीने व्यवहार करण्यावर भर दिला. यात सुरवातीपासूनच अशा पद्धतीने व्यवहार करणाऱ्या ग्राहकांचा चांगला प्रतिसाद लाभला. जिल्ह्यात वीज बिलासाठी ठिकठीकाणी रांगेत उभे राहण्याची वेळ येत होती. त्यात नोटाबंदीनंतर सुट्ट्या पैशांची समस्या निर्माण व्हायची आता या नोटाबंदीचा सकारात्मक फायदा ग्राहकांना डिजिटलकरणाकडे नेणारा ठरला. यामुळे ग्राहकांनी महावितरणची वीज बिले कॅशलेश पद्घतीने भरण्यासाठी अधिक प्रोत्साहन दिले आहे. जिल्ह्यात ग्रामीण व शहरी भागात जवळपास 2 लाख 98 हजार 153 एवढे ग्राहक आहेत. या डिसेंबर महिन्यात 20 हजार 651 एवढ्या ग्राहकांनी कॅशलेश पद्धतीने वीज बिले भरली आहेत. याअंतर्गत 1 कोटी 96 लाख रुपये महावितरणकडे जमा झाले. हे व्यवहार महा ई-सेवा केंद्र, महावितरण ऍप, व इंटरनेटच्या ऑनलाइन संस्था (पेमेंट वॉलेट) याद्वारे केले आहेत. जिल्ह्यातील ग्राहकांकडून याला प्रतिसाद असल्याचे सांगण्यात येत आहे.

कुडाळ उपविभागाअंतर्गत वेंगुर्ला : 2 हजार 588 ग्राहकांनी कॅशलेश व्यवहाराद्वारे वीज बिले भरली असून, 24 लाख 98 हजार 970 एवढे रुपये महावितरणकडे जमा झाले आहेत. त्यानुसार कुडाळ 1 हजार 760 ग्राहकामार्फत 27 लाख 92 हजार 90 रुपये, सावंतवाडी 5 हजार 369 ग्राहकांमार्फत 44 लाख 34 हजार 760 रुपये, दोडामार्ग 410 ग्राहकमार्फत 7 लाख 4 हजार 317 रुपये, ओरोस 1 हजार 139 ग्राहकमार्फत 9 लाख 67 हजार 552 रुपये असे मिळून 11 हजार 266 ग्राहकांमार्फत कॅशलेश पद्धतीच्या व्यवहारातून 1 कोटी 13 लाख 14 हजार 942 रुपये महावितरणकडे जमा झाले आहेत.
कणकवली विभागाअंतर्गत देवगडमध्ये 1 हजार 196 ग्राहकांमार्फत 13 लाख 46 हजार 430 रुपये, कणकवली 4 हजार 880 ग्राहकांमार्फत 36 लाख 86 हजार 510 रुपये, मालवण 1 हजार 477 ग्राहकांमार्फत17 लाख 21 हजार 290, वैभववाडी 743 ग्राहकांमार्फत 9 लाख 68 हजार 250 रुपये, आचरा 1 हजार 89 ग्राहकांमार्फत 6 लाख 48 हजार 363 रुपये असे मिळून एकूण कणकवली उपविभागामध्ये 9 हजार 385 ग्राहकांमार्फत वीज बिलाचे 83 लाख 70 हजार 843 रुपये कॅशलेश पद्धतीने भरण्यात आले आहेत.

ऑक्‍टोबर महिन्यानंतर या दोन महिन्यांत जवळपास ऑनलाइन वीज बिल भरणाऱ्या ग्राहकांच्या संख्येत 30 टक्के वाढ झाली आहे. ही चांगली बाजू असून, यात वाढ होत आहे. त्यामुळे नागरिक घरबसल्या वीज बिल भरत आहेत. त्यामुळे लोकांचा वेळ वाचत आहे. लोकांनी कॅशलेश व्यवहारासाठी जास्तीत जास्त लोकांनी ही पद्धत वापरावी.
- कैलाश लवेकर, कार्यकारी अभियंता, महावितरण कुडाळ उपविभाग.

Web Title: Increase of revenue in electricity department