देशातील पहिल्या फ्लोटिंग एलनजी टर्मिनलचे उद्घाटन

राजेश कळंबटे
मंगळवार, 1 मे 2018

रत्नागिरी : जयगड बंदरात सुरु झालेल्या एलएनजी टर्मिनलमुळे देशाला नवी व्यवस्था मिळाली आहे, या प्रकल्पामुळेच भविष्यात दाभोळ गॅस प्रकल्प बारमाही चालेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवार) व्यक्त केला.

रत्नागिरी : जयगड बंदरात सुरु झालेल्या एलएनजी टर्मिनलमुळे देशाला नवी व्यवस्था मिळाली आहे, या प्रकल्पामुळेच भविष्यात दाभोळ गॅस प्रकल्प बारमाही चालेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज (मंगळवार) व्यक्त केला.

ते जयगड येथे आयोजित एलइनजी  टर्मिनलच्या उदघाटन प्रसंगी बोलत होते. एच एनर्जीच्या वतीने जेएसडब्ल्यू जयगड बंदरात देशातील पहिले एफएसआरयुवर आधारित एलएनजी टर्मिनल सुरु करण्यात आलं आहे. या टर्मिनलच्या उदघाटनप्रसंगी केंद्रीय अवजडउद्योग मंत्री अनंत गिते, राज्यमंत्री रवींद्र चव्हाण, जे एस डब्ल्यू समूहाचे सज्जन जिंदाल, हिरानंदानी ग्रुपचे निरंजन हिरानंदानी, दर्शन हिरानंदानी यांच्यासह खासदार विनायक राऊत, आमदार उदय सामंत, आमदार प्रसाद लाड आदी उपस्थित होते. 

यावेळी बोलताना मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांनी दर्शन हिरानंदानी यांचे कौतुक करताना सांगितले की देशातला पहिला प्रकल्प जयगड बंदरात उभा राहत आहे.. 17 महिन्यात फ्लोटिंग टर्मिनल रुपात उभे केले. आज देशाला एलएनजीची आवश्यकता असल्याचे सांगत 2030 पर्यंत संपूर्ण देशात क्लीन फ्लूएल वापरण्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न पूर्णत्वास जाईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

आज महाराष्ट्र दिनी देशाला नवी व्यवस्था मिळाली आहे असे सांगून ते पुढे म्हणले कि दाभोळ गॅस प्रकल्प हा केवळ सहा महिने चालतो. गॅसअभावी तो उर्वरित सहा महिने बंद असतो. मात्र येथील एलएनजी टर्मिनल प्रकल्प बाराही महिने सुरू राहील असे त्यांनी सांगितले.

यावेळी केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी सांगितले की जयगड पोर्ट हे कोकणसह हे महाराष्ट्राला लाभलेले वरदान आहे. या ठिकाणी कोरियन टेक्नॉलॉजी वापरली जाणार आहे. बोटीवरच फ्लोटिंग प्लांट यात उत्तम टेक्नॉलॉजी आहे. स्पर्धेच्या युगात जगातील उत्तम टेक्नॉलॉजीचा वापर केला पाहिजे असं मत नामदार गीते यांनी व्यक्त केले.
तसेच 2 कुशल उद्योजक एकत्र आले की यश हे आपसूकच मिळते असे सांगत ते म्हणाले की सीएसआरच्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्यात प्रत्येक घरात पाईपमधून गॅस पुरवला जाईल. पाईपमधून गॅस पुरवणारा रत्नागिरी जिल्हा हा देशातील पहिला जिल्हा ठरेल असे गीते म्हणाले.

नाणारवर बोलणं मुख्यमंत्र्यांनी टाळलं
नाणार आॅईल रिफायनरीचा मुद्दा गाजताना रत्नागिरी दौऱ्यावर आलेले मुख्यमंत्री नाणार संदर्भातील काही भाष्य करतील अशी आशा होती. मात्र याबाबत त्यांनी काहीही भाष्य केलं. या कार्यक्रमातसुद्धा नाणारचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी टाळला.

Web Title: Indias first floating LNG terminal inaugurated in Ratnagiri