कृषी विद्यापीठात वार्षिक परिषदेचे उद्‌घाटन 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 19 मार्च 2017

दाभोळ : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे कृषी व संलग्न आंतरशाखीय संस्थेच्या वार्षिक परिषदेचे उद्‌घाटन काल (ता. 16) झाले. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठात प्रथमच अशा संस्थेची स्थापना करण्यात आली आहे. याचा फायदा कोकण, उर्वरित महाराष्ट्र तसेच संपूर्ण देशामधील कृषी आणि संलग्न विषयातील विद्यार्थी, शास्त्रज्ञ व शेतकरी यांना होणार आहे. 

यानिमित्ताने दापोलीत तीन दिवसांची परिषद सुरू झाले. त्यात देशातील विविध ठिकाणांहून आलेले शास्त्रज्ञ, त्यांचे शोध निबंध सादर करणार आहेत. उद्‌घाटनाला कामधेनू विद्यापीठ गुजराथचे कुलगुरु डॉ. एम. सी. वार्ष्णेय, भारतीय वनसेवेतील अधिकारी डॉ. बी. एन. गांगुली, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे कुलगुरू डॉ. डॉ. के. विश्वानाथा, महाराणा प्रताप कृषी व तंत्रज्ञान विद्यापीठ उदयपूरचे माजी कुलगुरू डॉ. यु. एस. शर्मा, डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. विजय मेहता व डॉ. किसन लवांडे, अकोला कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. मायंदे उपस्थित होते. कुलगुरू डॉ. तपस भट्‌टाचार्य यांनी संस्थेच्या जडणघडणीचा सविस्तर आढावा घेतला. तसेच आंतरशास्त्रीय संस्थेच्या नियतकालिकाचा फायदा सांघिक संशोधनासाठी होतो, हेही नमूद केले. या संमेलनात देशभरातून सुमारे 225 शास्त्रज्ञ सहभागी झाले आहेत. 
 
Web Title: innaugral function at Agriculture University