मुंबई-गोवा महामार्गावरून गाडी थेट नदीत

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

इनोव्हा गाडीतील चार जण बेपत्ता झाले आहेत. 

रत्नागिरी - इनोव्हा गाडीचा टायर फुटून गाडी नदीत कोसळली. संगमेश्वर तालुक्यातील धामणी गावातील ही घटना घडली आहे.

इनोव्हा गाडीतील चार जण बेपत्ता झाले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरून जात असताना गाडी थेट नदीत कोसळली. गाडीतील 12 वर्षाच्या मुलासह चारजण बेपत्ता आहेत. गाडीचा चालक नदीपात्रातील एका झाडाला अडकला होता. त्या फांद्यांचा आधार घेत तो झाडावर चढला म्हणून चालकाला वाचवण्यात स्थानिकांना यश आले आहे. 

ratnagiri
 

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: innova car accident at mumbai goa highway