तकलादू संरक्षक भिंती जीवघेण्या

सिद्धेश परशेट्ये
मंगळवार, 9 मे 2017

खेड - पोयनार प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन गेले बारा वर्षे रखडले आहे. पुनर्वसनाचे काम करणाऱ्या खात्याच्या नाकर्तेपणामुळे पुनर्वसित वेठीस धरले गेले आहेत. फुरूस सीमा येथे डोंगर उतारावर 120 कुटुंबाचे पुनर्वसन करण्यात येणार आहे. तेथील घरांना धोका होऊ नये, म्हणून संरक्षक भिंत बांधण्यात येत आहे. या भिंतीसाठी दगड व ग्रीडचा वापर करण्यात येत आहे. त्यामुळे सरंक्षक भिंतीनी संरक्षण होण्याऐवजी त्याच जीवघेण्या ठरण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली.

पुनर्वसन अधिकारी श्री. खेडेकर यांनी याबाबत सांगितले की, पन्नास लाखांचे हे काम आहे. येथे नऊ भिंती बांधण्यात येणार आहेत. हे काम पूर्ण कॉंक्रिटचे आहे. कामाच्या ठिकाणी आम्ही भेट दिली. त्यासाठी निधी पुरेसा आला नाही. ठेकेदाराला हे काम परवडले पाहिजे. येथे दगडाचा वापर होत आहे, हे आम्ही पाहिले; मात्र कमी पैशात ठेकेदाराला हे परवडणारे नाही. तरीही ग्रामस्थ म्हणत असतील तर आम्ही ठेकेदाराच्या कानावर या गोष्टी घालू. हे काम सुरू असताना त्या ठिकाणी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीखाली काम करावयाचे आहे. परंतु अधिकारी घरी व ठेकेदार त्यांना हवे तसे काम करतात, अशी अवस्था आहे. त्यामुळे पुनर्वसन होणारे लोक जाग्यावर जाऊन भिंतीच्या कामाला विरोध करीत आहेत.

सुपरवायझरला धारेवर धरले
ठेकेदाराची सुपरवायझर श्री. चव्हाण यांच्याशी ग्रामस्थांशी चर्चा केली. त्यांनी सांगितले की, या कामाची तुम्ही क्वालिटी कंन्ट्रोलमार्फत चौकशी करा. यामध्ये दगड आढळणारच नाहीत. परंतु त्या भिंतीची बारकाईने पाहणी केली असता दगडांचा भरावच भिंतीत आढळला. त्यामुळे ग्रामस्थांनी सुपरवायझरला धारेवर धरले. त्याने तत्काळ ठेकेदाराशी संपर्क साधून त्याला माहिती दिली. तत्काळ ठेकेदाराने अधिकाऱ्यांशी चर्चा करून ग्रामस्थांची एकत्र बैठक घेऊ, ग्रामस्थांना हवे ते काम करून देऊ, सध्या थांबा, अशी आर्जव केल्याची माहिती प्रकल्पग्रस्त शेखर विचारे यांनी सांगितली.

Web Title: Insecure walls in Khed