कुठल्या जिल्ह्यात संस्थात्मक क्‍वारंटाईनमध्ये झाली सव्वा दोन हजारने वाढ... वाचा

विनोद दळवी
Tuesday, 4 August 2020

सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी 13 जण कोरोनामुक्त झाले. त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात सोमवारी संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये दोन हजार 224 व्यक्ती वाढला. त्यामुळे अशांची संख्या 20 हजार 954 झाली आहे.

दरम्यान, जिल्ह्यात सोमवारी 13 जण कोरोनामुक्त झाले.  त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. आता कोरोनामुक्त झालेल्या रूग्णांची संख्या 297 झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात सक्रिय रूग्णांची संख्या 102 राहिली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. धनंजय चाकुरकर यांनी दिली. 

शासकीय संस्थात्मक क्वारंटाईनमधील तीन व्यक्ती कमी झाल्याने येथील संख्या 38 आहे. गाव पातळीवरील संस्थात्मक क्वारंटाईनमधील दोन हजार 162 व्यक्ती वाढल्याने येथील संख्या 17 हजार 299 झाली आहे. नागरी क्षेत्रातील संस्थात्मक क्वारंटाईनमधील एक हजार 65 व्यक्ती वाढल्या असून येथील संख्या 3 हजार 617 झाली आहे. जिल्ह्यात नव्याने दोन हजार 975 व्यक्ती दाखल झाल्याने दोन मेपासून जिल्ह्यात दाखल होणाऱ्या व्यक्तींची संख्या एक लाख 70 हजार 131 झाली आहे. जिल्ह्यात सात कंटेन्मेंट झोन वाढले असून 44 कंटेन्मेंट झोन सक्रिय आहेत.

तपासणी केंद्राला नव्याने 136 नमूने आले. त्यामुळे नमुन्यांची संख्या सहा हजार 621 झाली. यातील 6 हजार 502 अहवाल आले तर 119 प्रलंबित आहेत. प्राप्त अहवालातील सहा हजार 100 निगेटिव्ह आहेत. बाधितपैकी 297 रुग्ण बरे होवून घरी परतले. सहा व्यक्तीचे दुर्दैवी निधन झाले आहे. परिणामी जिल्ह्यात 102 रुग्ण सक्रिय आहेत. 
जिल्ह्यातील आयसोलेशन कक्षात सध्या 125 जण आहेत. यातील डेडिकेटेड कोविड हॉस्पिटल जिल्हा रूग्णालयात 48 बाधित आणि 20 संशयित आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये 22 बाधित आणि 3 संशयित आहेत. कोविड केअर सेंटरमध्ये 24 बाधित आहेत. पाच बाधित होम क्वारंटाईन आहेत. तिघे जिल्ह्याबाहेरील आहेत. जिल्ह्यातील चार हजार 702 व्यक्तींची आरोग्य तपासणी झाली. 

हे पण वाचा - अन् एसटीसमोर गुडघे टेकून ते ढसाढसा रडले

नवीन दोन कंटेन्मेंट झोन 
कणकवली तालुक्‍यातील नवी कुर्ली वसाहत येथील मारुती पाटील यांचे घर व 100 मीटर परिसर आणि देवगड तालुक्‍यातील जामसंडे तरवाडी येथील प्रकाश जनार्दन दहिबावकर यांचे घर व 50 मीटर परिसर कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी कंटेन्मेंट झोन केल्याची माहिती कणकवली उपविभागीय अधिकारी वैशाली राजमाने यांनी दिली.

हे पण वाचा - कैदी राजेश गावकर प्रकरण ; कारागृह अधीक्षकाला नागपूर पोलिसांना घेतले ताब्यात ; मात्र  सुभेदार फरार -

संपादन ः विजय वेदपाठक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Institutional quarantine increased by a quarter to two thousand