अडीच हजाराचा बोनस देऊन एसटी कर्मचाऱ्यांची खिल्ली

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 3 नोव्हेंबर 2016

कुडाळ - संपूर्ण महाराष्ट्राच्या प्रवाशांची लाईफलाईन असलेली व 80 टक्के पेक्षाही जास्त लोकांच्या प्रवासाचे एकमेव साधन असलेले एस. टी. मधील कर्मचाऱ्यांची 2500 रुपये बोनस देऊन प्रशासनाने दिवाळीत चेष्टा केल्याचे पत्रकात मनसे एसटी सेनेचे जिल्हा अध्यक्ष बनी नाडकर्णी यांनी म्हटले आहे.

पत्रकात म्हटले आहे की, कुठलेही सत्र असो किंवा सुटी असो, जिवाची तमा न बाळगता काम करणाऱ्या एस.टी. कर्मचाऱ्यांची आजपर्यंत प्रशासनाने अक्षरशः पिळवणूक केलेली आहे. खोटी आश्‍वासने देऊन आजपर्यंत अनेक वेळा प्रशासनाचे, कर्मचाऱ्यांचे हाल केले आहे. 2500 रुपये बोनस देऊन जर का कुठल्याही संघटनेने त्याचे श्रेय घेत असेल तर त्यांची किव करावीशी वाटते, कारण 2500 रुपयांमध्ये आजच्या महागाईत काय घरात शिजते हे त्यांना ठाऊक असेलच. प्रशासनाने फक्त डिवाईड अँड रुलची पॉलिसी वापरू आपली पोळी भाजली आहे. इंग्रजांनी केले तसेच आज हे लोक करत आहेत आणि त्याचा प्रचंड फटका हा कर्मचाऱ्याला सोसावा लागत आहे.

अल्प प्रमाणात कर्मचाऱ्यांकडून तासन्‌तास काम करून घेणाऱ्या या प्रशासनाला आता धडा शिकवण्याची वेळ आली आहे. संपूर्ण कर्मचाऱ्यांना आता एकजुटीने एकत्र येऊन प्रशासनाला जाब विचारायची वेळ आता आली आहे. ज्या दिवशी हे चित्र संपूर्ण महाराष्ट्रात घडेल तेव्हाच या ढोंगी प्रशासनाला जाग येणार. आता कर्मचाऱ्यांना चांगले दिवस हवे असतील तर मराठा क्रांती मूक मोर्चानंतर एस.टी.कर्मचारी यांना मूक मोर्चाची गरज आहे. ज्यामध्ये कुठल्याही संघटनेचा संबंध बाजूला ठेवून एकजुटीने या प्रशासनाला जागे करावे लागणार आहे, असे म्हटले आहे.

Web Title: Insult of MSRTC employees giving 2500 bonus