जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषद डिसेंबरमध्ये रत्नागिरीत

मकरंद पटवर्धन
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

रत्नागिरी-  महाराष्ट्रासह देश-विदेशातील सर्व देवरुखे ब्राह्मण समाजाचे आकर्षण असणारी जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषद 15 व 16 डिसेंबरला रत्नागिरीत होणार आहे. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे परिषद होणार असून परिषदेची जय्यत तयारी सुरू झाली आहे.

रत्नागिरी-  महाराष्ट्रासह देश-विदेशातील सर्व देवरुखे ब्राह्मण समाजाचे आकर्षण असणारी जागतिक देवरुखे ब्राह्मण परिषद 15 व 16 डिसेंबरला रत्नागिरीत होणार आहे. प्रमोद महाजन क्रीडा संकुल येथे परिषद होणार असून परिषदेची जय्यत तयारी सुरू झाली आहे. बंदररोड येथील देवर्षीनगरात आढावा बैठक झाली. या दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक बांधिलकी जपली.

जागतिक परिषदेचे निमंत्रण व प्रवेशिका वितरणाची सुरवात रत्नागिरीचे ग्रामदैवत श्री देव भैरी देवाचे आशीर्वाद घेऊन करण्यात आले. याप्रसंगी देवस्थानचे अध्यक्ष मुन्नाशेठ सुर्वे उपस्थित होते. बैठकीत कार्यकर्त्यांना जागतिक परिषदेनिमित्त प्रकाशित केलेले निवेदन, प्रवेश तिकिटे, पोस्टर्स, पोस्टकार्ड आदी गोष्टींचे वितरण केले. परिषदेची रूपरेषा व गठित केलेल्या कार्यकारी समित्यांच्या कामांचा आढावा बैठकीत घेण्यात आला.

परिषदेनिमित्त विविध सर्वांगीण उद्दिष्टे निश्‍चित करण्यात आली. सामाजिक क्षेत्रातील अनेक प्रतिष्ठित व्यक्तींचा सहभाग व मार्गदर्शन यात लाभणार आहे. अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचा समावेशही या परिषदेत आहे. परिषद यशस्वी करण्यासाठी बैठकीत विविध सांगोपांग चर्चा करण्यात आली. त्यानुसार कृतिशील पाऊले उचलण्यात येत आहेत.

या परिषदेच्या निमित्ताने सर्व देवरुखे जनांची शिरगणती केली जात आहे. त्यासाठी http://members.devrukhebrahman.com/Registration.php या लिंकवर जाऊन प्रत्येक ज्ञातीबांधवांनी त्यावर आपली नोंदणी करावी, असे आवाहन केले आहे.

बैठकीला जागतिक परिषदेचे अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर निमकर, रत्नागिरी देवरुखे संघाचे अध्यक्ष विनोद जोशी, परिषदेचे कार्यवाह सुरेश शितूत, सतीश शेवडे, राजू भाटलेकर, रामकृष्ण तायडे, सतीश काळे उपस्थित होते.

Web Title: International Devrukhe Bramhan conference in Ratnagiri