'त्या' समुद्र स्फोटांचा छडा लावा

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 8 ऑगस्ट 2016

वेंगुर्ले : येथील समुद्रात एप्रिलमध्ये झालेल्या स्फोटसदृश आवाजांचा छडा लावा, अशी मागणी मच्छीमारांनी कोस्ट गार्ड व पोलिस अधिकाऱ्यांकडे केली.
 
सागरी सुरक्षारक्षक, मच्छीमार संस्था प्रतिनिधी, क्रियाशील मच्छीमार व नौकाधारक यांची बैठक आज भारतीय तटरक्षक समिती रत्नागिरीचे कोस्ट गार्ड अधिकारी कुमार यांच्या अध्यक्षतेखाली व पोलिस निरीक्षक मधुकर आबाळे यांच्या उपस्थितीत येथील पोलिस ठाण्यात झाली. या वेळी विविध समस्या व विषयांवर चर्चा करण्यात आली. या वेळी ही मागणी करण्यात आली.
 
श्री. कुमार यांनी अज्ञात जहाज दिसल्यास मच्छीमारांनी कोणती खबरदारी घ्यावी, नौकेवर कोणती यंत्रणा वापरावी, जीवरक्षक साधने कोणती वापरावीत, संपर्क यंत्रणा कोणती ठेवावी, संशयास्पद वस्तू किंवा व्यक्ती आढळून आल्यास कोणती खबरदारी घ्यावी याबाबत मार्गदर्शन केले.
 
एप्रिल महिन्यात तीन वेळा वेंगुर्ले किनारपट्टीवर स्फोटसदृश आवाज आले होते. त्यामुळे मच्छीमारांत भीतीचे वातावरण पसरले होते. त्या वेळी तटरक्षक प्रवीण सौदाणे, उत्तम नाविक, मनोज थापा यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून समर्पक उत्तरे दिली गेली नाहीत. राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या शास्त्रज्ञांनी या किनारपट्टीवर व समुद्रात पाहणी केली होती; मात्र ते स्फोटसदृश आवाज कशाचे होते? कशामुळे झाले? याबाबत अद्याप निदान झालेले नाही. त्यामुळे यापुढे अशा घटना घडल्यास मच्छीमारांनी काय करावे? या स्फोटसदृश आवाजांचे त्वरित निदान करून मच्छीमारांची संभ्रमावस्था त्वरित दूर करावी, अशी मागणी उपस्थित मच्छीमारांनी या वेळी केली.
 
मासेमारी सुरू झाल्यानंतर परप्रांतीय पर्ससिन ट्रॉलर्स येथे येऊन धुमाकूळ घालतात. बऱ्याच वेळा त्यांच्याकडे परवानेही नसतात. अशा नौकांवर कारवाई करण्यास मत्स्य व्यवसाय विभागाकडे पुरेसे कर्मचारी नसल्याने त्यांना रोखता येत नाही. याबाबत विचार व्हावा. नौदल विभागाने नोकर भरती करताना मच्छीमार समाजातील तरुणांचा विचार करावा आदी मागण्याही या वेळी मच्छीमारांनी मांडल्या. बैठकीला मच्छीमार नेते वसंत तांडेल, मच्छीमार बाबी रेडकर, सुहास तोरस्कर, मोहन सागवेकर, अनंत केळुसकर, संतोष तांडेल, गजानन कुबल यांच्यासह 80 मच्छीमार उपस्थित होते.
 
संयुक्त बैठक लवकरच
नवीन नौकांना वर्षे-दोन वर्षे व्हीआरजी मिळत नाहीत, सद्यःस्थितीत अत्यावश्‍यक असलेले बायोमेझिक कार्डही मिळत नाहीत, मासेमारी परवाने वेळेवर मिळत नाही यासंदर्भात एकत्रित चर्चा करण्यासाठी पोलिस विभाग, मत्स्य विभाग व मच्छीमार यांची 25 जुलैपूर्वी बैठक घेण्यात यावी, अशी मागणीही या वेळी करण्यात आली. बैठक लवकरात लवकर घेऊन योग्य तो मार्ग काढू, असे पोलिस निरीक्षक आबाळे यांनी सांगितले.

Web Title: INVESTIGATION blasts in sea