लोखंडी ४५ साकवांना दुरुस्तीची प्रतीक्षा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 मार्च 2017

राजापूर तालुक्‍यासाठी १ कोटी ४४ लाख रुपयांची गरज; काही ठिकाणी धोकादायक स्थितीत

राजापूर - शिमगोत्सवाच्या कालावधीत संगमेश्‍वर आणि दापोली येथे साकव कोसळल्याने साकवांच्या दुरुस्तीचा प्रश्‍न चर्चेत आला आहे. तालुक्‍यातील तब्बल ४५ लोखंडी साकव दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. लोखंडी साकवांच्या दुरुस्तीसाठी सुमारे १ कोटी ४४ लाख ३० हजार रुपयांची आवश्‍यकता आहे. 

पावसाळ्यामध्ये या पाण्याचा प्रवाह जोरात असल्याने ओढे, नदी, नाल्यावर तात्पुरत्या स्वरूपात लाकडी  साकव बांधले जात होते. पुढे लाकडी साकवांचे लोखंडी साकवांत रूपांतर झाले. त्यानंतर काही ठिकाणी हे  साकव काढून टाकून पूल उभारण्यात आले; मात्र सध्या अस्तित्वात असलेल्या साकवांची दुर्दशा झाली आहे. तालुक्‍यातील तब्बल ४५ साकव धोकादायक झाले आहेत.

यामध्ये धोपेश्वर-तिठवली साकव, पेंडखळे सुर्वेवाडी साकव, हातिवले भंडारवाडी साकव, ओणी कोंडवाडी साकव, सागवे रामेश्‍वर मंदिर नजीकचा साकव, डोंगर साकव, ओशिवळे परटवली साकव, दळे धरणवाडी जैतापूर साकव, गोठिवरे कांजरकोंड लांजेकरवाडी साकव, तुळसवडे रवळनाथ  मंदिराजवळील साकव, सागवे बुरंबेवाडी साकव, तुळसुंदे प्राथमिक शाळेजवळील साकव, विल्ये गुरववाडी रोहिदासवाडी साकव, झर्ये पळसवाडी साकव, दळे गिरकरवाडी साकव, कोदवली साकव नं १, हातदे विश्‍वासराववाडी बिबाडी साकव, धामणपी ओशिवले साकव, रायपाचण हॉस्पिटलजवळ साकव, कोतापूर साकव, धोपेश्वर गांगोमंदिर साकव, खरवते कोष्टेवाडी साकव, पांगरे बुद्रुक सावंतवाडी, नाणार पालेकरवाडी मराठी शाळेजवळील साकव, तेरवण बाईंगवाडी साकव, सौंदळ पाटीलवाडी साकव, देवाचेगोठणे बुरंबेवाडी, गोवळ वज्राच्या नाल्या जवळील साकव, शेंबवणे शाळेजवळील साकव, सडे चव्हाणवाडी, सागवे वरचीवाडी, साखर आंबेरकोणी साकव, साखर भंडारवाडी, पाचल बौद्धवाडी, सावडाव शेलारवाडी, सागवे वाडापाल्ये, मांजरे जुवे साकव, तळवडे मोरेवाडी साकव, सोमस साकव, नाटे ठाकरेवाडी, हातिवले आरेकरवाडी साकव, मोरोशी खडकंबा साकव या साकवांचा समावेश आहे. या साकवांची दुरुस्ती न झाल्यास संगमेश्‍वर, दापोलीत घडलेल्या घटनेची पुनरावृत्ती होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

Web Title: Iron 45 sakav wait repairs

टॅग्स