धक्कादायक ! कळणे नदी प्रदुषित; गोव्यासही फटका  बसण्याची शक्यता

Issue Of Kalane River Pollution Goa Will Also Affect Sindhudurg Marathi News
Issue Of Kalane River Pollution Goa Will Also Affect Sindhudurg Marathi News

कळणे ( सिंधुदुर्ग) - येथील खनिज प्रकल्पातून दूषित पाण्याची गळती होते. हे खनिज मिश्रित सांडपाणी कळणे नदीत मिसळत असल्याने नदी प्रदूषित होत आहे. ही नदी पुढे गोव्याच्या कोलवाळ नदीला मिळते. यावर गोव्यातील चांदेलसह इतर पाणी योजना अवलंबून असल्याने पाण्याचे प्रदुषण रोखण्याची गरज आहे. 

दरम्यान, या नदीवरच कळणे गावची नळपाणी पुरवठा योजनेची विहीर आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा मोठा प्रश्न निर्माण होणार आहे. गेली दहा वर्षे कळणेत खनिज प्रकल्प सुरु आहे. येथील खोदकाम भूस्तराच्या खाली गेल्याने मोठा तलाव निर्माण झाला आहे. शिवाय एका बाजूने डोंगराचा कडा असून दुसऱ्या बाजूला मातीच्या भरावाची भिंत उभी केली आहे.

पावसाळ्यात प्रकल्प अंतर्गत तयार झालेल्या तळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी जमा होते. हे पाणी गेल्या वर्षीपासून मातीच्या भरावाला छेदून नदीच्या दिशेने असलेल्या ओढ्यात येते. ज्या ठिकाणी हे पाणी नदीत मिसळते. या नदीवरच गावची नळपाणी योजनेची विहिर आहे. त्यामुळे दूषित पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. गेल्या वर्षी हीच समस्या होती. स्थानिक अनेक तक्रारी करूनही प्रशासनाने दखल घेतली नाही. 

""आमच्या प्रकल्पात पाण्याचा साठा नाही. प्रकल्पात प्रक्रिया ट्रीटमेंट प्लांटही नाही. त्यामुळे प्रकल्पातून पाणी बाहेर पडण्याची शक्‍यता नाही. तसे असते तर आम्ही स्वतः त्याची खबरदारी घेतली असती. डोंगर भागातून किंवा फॉरेस्टमधून जमिनीखालून पाणी येत असेल तर त्याचा आमच्या प्रकल्पाशी काहीही संबंध नाही.'' 
- मनोज ठाकूर, कंपनीचे प्रतिनीधी 

""खनिज मिश्रित पाणी नदीत ज्या ठिकाणी मिसळते, तेथुन 100 मीटर अंतरावर नळपाणी योजनेची विहिर आहे. आज ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य यांच्यासह जावून पाण्याचे नमुने घेतले. जर प्रशासन आणि कंपनीने या प्रश्नांची दखल घेतली नाही, तर खबरदारी म्हणून नळपाणी पुरवठा बंद करण्याचा निर्णय घ्यावा लागेल.'' 
- जान्हवी देसाई, सरपंच, कळणे 

चांदेल योजनेवर परिणामाची भिती 
चांदेल (गोवा) मध्ये 15 दशलक्ष क्षमतेचा प्रादेशिक जल शुद्धीकरण प्रकल्प आहे. या प्रकल्पाची जॅकवेल याच नदीवर आहे. खनिजयुक्‍त मातीने प्रदूषित झालेले पाणी या प्रकल्पापर्यंत पोहचत आहे. त्यामुळे या प्रकल्पातील पाण्यावर परिणाम होऊ शकतो. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com