मालगुंड पुस्तकांचे गाव बनणार का?

राजेश कळंबटे
रविवार, 12 ऑगस्ट 2018

रत्नागिरी - ‘हाय वे ऑन वे’ च्या धर्तीवर मालगुंडला पुस्तकांचे गाव करण्याचे आश्‍वासन डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण करणार का असा प्रश्‍न कोकण मराठी साहित्य परिषदेने ( कोमसाप) एका पत्राद्वारे मराठी भाषा आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना विचारला आहे.

रत्नागिरी - ‘हाय वे ऑन वे’ च्या धर्तीवर मालगुंडला पुस्तकांचे गाव करण्याचे आश्‍वासन डिसेंबर 2018 पर्यंत पूर्ण करणार का असा प्रश्‍न कोकण मराठी साहित्य परिषदेने ( कोमसाप) एका पत्राद्वारे मराठी भाषा आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांना विचारला आहे. दोन वर्षांपुर्वीचे आश्‍वासन पूर्ण न करतानाच कोमसापच्या निमंत्रणही मंत्रीमहोदय का स्विकारत नाहीत, याचा जाबही विचारण्यात आला आहे.

मालगुंड पुस्तकांचे गाव करणार असे 2015 च्या कोमसापच्या परिषदेत मंत्री तावडेंनी जाहीर केले. त्यानंतर शासनाकडून कोमसापला सहकार्य करा, अशी विनंती करण्यात आली. मालगुंडला कवी केशवसुत स्मारक तयार असून तेथे पुस्तकांचे गाव तयार केल्यास पर्यटकांचा प्रतिसाद मिळेल, असा विश्‍वास होता. त्यानुसार 17 नोव्हेंबर 2015 ला कोमसापतर्फे उपसचिवांशी चर्चा झाली.

मालगुंडला पूर्व सर्वेक्षणासाठी शासनाचे प्रतिनिधी म्हणून कक्ष अधिकारी उदय गवस, मंगेश कुडतरकर, पर्यटन विकास महामंडळाचे प्रतिनिधी, मराठी विकास संस्थेचे प्रतिनिधी यांना कोमसापसह मालगुंडवासीयांनी सहकार्य केले. त्या प्रतिनिधींनी समाधान व्यक्त करत अनुकूल अभिप्राय दिला.

मराठी भाषा विभागाचे तत्कालीन प्रधान सचिवांच्या सुचनेनुसार 16 डिसेंबर 2015 ला कोमसापचे केंद्रीय अध्यक्ष डॉ. महेश केळुसकरनी आराखडा सादर केला. त्यानंतर सोळा महिन्यांनी अचानक पाचगणी जवळचे भिलार गावाचे नाव जाहीर झाले. 4 मे 2017 ला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनही झाले. त्यावेळी कोमसापतर्फे डॉ. महेश केळुसकर, शशिकांत तिरोडकरांनी घेतलेल्या भेटीवेळी मे 2018 पर्यंत मालगुंडलाही पुस्तकांचे गाव करू असे तोंडी आश्वासन दिले. त्यावर शासनाकडून कार्यवाही झालेली नाही.

या प्रश्‍नांची द्या उत्तरे!

  • सकारात्मक अहवाल असताना, भिलारची निवड कशी केली 
  • मालगुंड अधिक पर्यटकांची ये - जा असलेले गाव आहे, तेथील ग्रामस्थ, कोमसापची तयारी असताना का डावलले 
  • मुख्यमंत्र्यांना पत्रव्यवहार आणि फाईल दाखवल्या का
  • कोमसापच्या एकाही कार्यक्रमाला विनोद तावडे यांनी उपस्थित दर्शवली नाही याचे कारण काय 
  • डिसेंबर 2018 पर्यंत तरी मालगुंड पुस्तकाचे गाव होईल का

कोमसापतर्फे पाठविलेल्या पत्रानुसार ग्रामस्थ यासाठी सज्ज झाले होते; मात्र शासनाकडून त्यांची निराशा झाली आहे.

- गजानन पाटील, ग्रामस्थ

Web Title: issue of Malgund Books Village