सागरी सुरक्षा वॉर्डनमुळे रामभरोसेच ? 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

रत्नागिरी - सागरी सुरक्षेच्या दृष्टीने राज्य शासनाने जिल्ह्यात 63 वॉर्डनची (सागरी सुरक्षारक्षक) नियुक्ती केली आहे. मात्र, त्यांच्या नियुक्तीवर नियंत्रण ठेवणारी यंत्रणाच सुस्तावल्याने सागरी सुरक्षेचे तीन-तेरा वाजले आहेत. काही वॉर्डन महिना, दोन महिने गायब असतात. मात्र, सहकाऱ्याच्या मदतीने हजेरी लावून सुरक्षा रामभरोसे सोडत असल्याचे जोरदार चर्चा आहे. मत्स्य विभाग अशा वॉर्डना धडा शिकवणार का, असा सवाल उपस्थित होत आहे. 

जिल्ह्यातील लॅंडिंग पॉईंटवर बारीक लक्ष ठेवण्यासाठी ही व्यवस्था निर्माण करण्यात आली आहे. कामगार कल्याण विभागाकडून याबाबची यादी मागवून वॉर्डनची नियुक्ती करण्यात आली आहे. जिल्ह्यात 63 वॉर्डनची नियुक्ती करण्यात आले. लॅंडिग पॉइंटवर 24 तास बारीक नजर व हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वॉर्डन आहेत. हे पॉइंट वस्ती पासून दूर असल्याने दोन किंवा तिघांची नियुक्ती केली आहे. शासनाकडून त्यांच्या पोस्टनुसार सुमारे बारा ते चौदा हजार पगार आहे. काही महिन्यांपूर्वी पगार रखडल्याने हा मुद्दा सर्वांनी लावून धरल्याने जुलै महिन्यापर्यंत पगार झाला. 

सागरी सुरक्षा धोक्‍यात 
काही वॉर्डरचा वेगळाच पराक्रम पुढे आला आहे. परवाना अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली पर्यवेक्षकांमार्फत वॉर्डनवर लक्ष ठेवले जाते. परंतु काही भागातील वॉर्डनर महिना-महिनाभर गायब असतात. मात्र, सहकाऱ्यांमार्फत त्यांची हजेरी लावली जात असल्याचे समजते. सागरी सुरक्षा या तऱ्हेने धोक्‍यात घातली जात आहे. 

अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणले 
याबाबत वॉर्डनरवर नियंत्रण असलेल्या सहायक मत्स्य व्यवसाय आयुक्त कार्यालयाच्या अधिकाऱ्यांच्या हे निदर्शनास आणून दिल्यानंतर याबाबतची चौकशी करून योग्य ती कारवाई करू, असे त्यांनी स्पष्ट केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: issue Marine safety due to warden