मुंबई गोवा महामार्ग रूंदीकरणाला पुन्हा गती

मुंबई गोवा महामार्ग रूंदीकरणाला पुन्हा गती

कणकवली - महामार्गाच्या चौपदरीकरणात शहरातील ज्या इमारती संपादीत झालेल्या आहेत आणि अर्धवट स्थितीत असलेली शिल्लक बांधकामे 22 जानेवारीपासून काढून टाकली जाणार आहेत. त्यानंतर गेले आठ दिवस थांबलेल्या महामार्गाच्या शहरातील चौपदरीकरणाच्या रूंदीकरणाला सुरूवात केली जाणार आहे.

या महामार्गाच्या पनवेल ते झाराप पर्यंतच्या चौपदरीकरणाच्या कामाचा आढावा महामार्ग प्राधिकरणचे मुख्य अभियंता विनय देशपांडे यांच्या पथकाने घेवून महामार्गाच्या कामाला वेग देण्याबाबत सुचना केली आहे.

पनवेल ते झाराप या मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्ग 66 च्या चौपदरीकरणाला दोन वर्षापासून सुरूवात झाली. सिंधुदुर्गात खारेपाटण ते कलमठ असे केसीसी या कंपनीला काम देण्यात आले आहे. तर कलमठ ते झाराप दिलीप बिल्डकॉन या कंपनीकडे ठेका आहे. मात्र स्ट्रक्‍चरल ऑडीटनंतर सुरू झालेल्या राष्ट्रीय महामार्गावरील जुन्या पुलांसाठी उभारलेल्या पर्यायी पुलांची कामे अर्धवट स्थितीत आहेत. यासाठी फेरनिविदा प्रक्रीया झाली आहे.

या पुलांच्या वस्तुस्थितीची पाहणी करण्यासाठी आणि महामार्गाच्या चौपदरीकरणाच्या कामाच्या प्रगतीबाबत आढावा घेण्यासाठी श्री. देशपांडे यांनी पाहणी करून उपअभियंत्यांना सुचना केल्या आहेत. 

कणकवली शहरात काही गाळेधारकांना नोटीसा बजावण्यात आली नव्हती. त्यामुळे हे प्रकरण न्यायप्रविष्ठ झाले. या प्रकरणाबाबत कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करून आता रस्त्याच्या रूंदीकरणाला सुरूवात होणार आहे. शहरातून जाणाऱ्या 1260 मीटर लांबीच्या ओव्हरब्रीजचे काम प्रगतीपथावर आहे; परंतु या कामाला अडसर ठरत आहे ती 6 मीटरच्या पर्यायी रस्त्याची. मुख्या चौकापासून एस. एम. हायस्कूलपर्यंत एका बाजूला काही बांधकामे अर्धवट स्थितीत आहेत. त्याबाबतची कायदेशीर कारवाई पूर्ण झाली असून 22 जानेवारीपासून प्रत्यक्ष कामाला सुरूवात होईल, अशी माहिती प्रकाश शेडेकर यांनी दिली.

अर्धवट इमारतींचे स्ट्रक्‍चरल ऑडीट
शहरातील महामार्गालगतच्या काही इमारती अर्धवट स्थितीत आहेत. त्या अबाधीत ठेवण्यापूर्वी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता स्ट्रक्‍चरल ऑडीट करणार आहेत. तसा अहवाल नगरपंचायतीला सादर केला जाणार आहे. इमारती निवासी आणि व्यावसायीक हेतूच्या असल्याने त्या योग्य असल्या तरच राखल्या जातील.

संपादीत घरे पूर्णतः काढून टाकणार 
महामार्गालगत जी जागा संपादीत झालेली आहे आणि अशा जागांवरील घरे, गोठे, इमारती यांची संपूर्ण संपादन प्रक्रीया झालेली असून मोबदलाही वाटप झालेला आहे. अशा मालमत्ता पूर्णपणे काढून टाकल्या जाणार आहेत. संपादन आणि मोबदला वाटप झालेल्या कोणत्याही इमारती ठेवता ेयेत नाही अशी माहिती उपअभियंता श्री. शेडेकर यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com