मुंबई-गोवा मार्गाच्या चौपदरीकरणाला संगमेश्‍वर तालुक्‍यात ब्रेक 

संगमेश्‍वर - धामणीजवळ चौपदरीकरणाचे काम अद्यापही ठप्प आहे. 
संगमेश्‍वर - धामणीजवळ चौपदरीकरणाचे काम अद्यापही ठप्प आहे. 

संगमेश्‍वर - गतवर्षी सुरू झालेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरण कामाला संगमेश्‍वर तालुक्‍यात ब्रेक लागला आहे. पावसाळा संपला तरी काम सुरू झालेले नाही तर गेले दोन वर्षे सुरू असलेले शास्त्री पुलाचे कामही पुढे सरकत नसल्याने चौपदरीकरणाबाबत संभ्रम आहे. 

तालुक्‍यातील सप्तलिंगी पुलाच्या रुंदीकरणाचा आरंभ करीत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ऑक्‍टोबर 2014 ला चौपदरीकरण मोहिमेचा नारळ फोडला. यानंतर प्रत्यक्षात रस्ता चौपदरीकरण कामाला 2016 मध्ये निवळीतून सुरवात केली. संगमेश्‍वर तालुक्‍यातील आरवली ते बावनदी हा टप्पाही त्याच काळात सुरू झाला. दरम्यानच्या काळात शास्त्री पुलाच्या नव्या बांधकामाला सुरवात झाली. संपादित जमिनींचे मोबदले देण्यात आले. जागा ताब्यात आल्या. महामार्गालगत वृक्षतोड सुरू झाली. सपाटीकरण सुरू होते. ही सर्व कामे पावसाआधी झाली. त्यामुळे पुढील काळात चौपदरीकरण वेग घेईल,अशी अपेक्षा होती. 

प्रत्यक्षात पाऊस गेल्यावर आता दिवाळी जवळ आली तरी महामार्गाच्या पुढील कामाचा पत्ता नाही. अद्यापही झाडे तोडण्याचे काम सुरूच आहे तर संगमेश्‍वर परिसरातील जागा ताब्यात घेण्यात आलेली नाही. शास्त्री आणि सप्तलिंगी पुलाचे काम गेले 6 महिने जैसे थे आहे. अशा स्थितीत नेमके चौपदरीकरण होणार तरी केव्हा असा प्रश्‍न उपस्थित करण्यात येत आहे. 

संपूर्ण महामार्गाचे चौपदरीकरण 2019 ला पूर्ण करू असे आश्‍वासन नितीन गडकरी यांनी दिले होते प्रत्यक्षात सध्याच्या कामाची गती पाहता ते पूर्णत्वास जाणे कठीण आहे. आगामी काळात या कामाचा वेग वाढवणे आणि पुढील पावसाळ्यापर्यंत 90 टक्‍के काम पूर्ण करणे एवढाच पर्याय ठेकेदारासमोर शिल्लक आहे. 

चौपदरीकरणाचे काम वेगात सुरू करावे आणि दिलेल्या आश्‍वासनाप्रमाणे ते पूर्ण करावे. काम जमत नसेल तर संबंधित ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून ठेकेदार बदलावा, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरेल. 
- संजय कदम
, शाखाप्रमुख- संगमेश्‍वर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com