कणकवलीत चौपदरीकरण रोखण्याचा निर्धार

कणकवलीत चौपदरीकरण रोखण्याचा निर्धार

कणकवली - शहरातील चौपदरीकरणाचे सुरू असलेले काम रोखण्याचा निर्णय आज गांगो मंदिर येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला. चौपदरीकरण बाधितांना मोबदला मिळत नाही, तोपर्यंत लढा देण्याचेही बैठकीत निश्‍चित करण्यात आले.

शहरातील महामार्गालगतचे व्यापारी, गाळेधारक, भाडेकरू आणि स्टॉलधारकांची बैठक येथील गांगो मंदिरात झाली. महामार्ग प्रकल्प संघर्ष समितीचे अध्यक्ष उदय वरवडेकर यांच्यासह सुशील पारकर, माधव शिरसाट, पप्पू ठाणेकर, उद्देश कासार, पंढरी ढवण आदींसह व्यापारी, गाळेधारक, भाडेकरू आणि स्टॉलधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते. शहरात दोन दिवसांपूर्वी चौपदरीकरणाचे काम सुरू झाले आहे.

पहिल्या टप्प्यात ३० मीटर क्षेत्रातील बांधकामे हटविली जाणार आहेत. त्याची सुरवात उद्या (ता. २३) पासून होणार आहे; मात्र शासनाने व्यापारी आणि गाळेधारकांना योग्य मोबदला दिलेला नाही तर स्टॉलधारक आणि भाडेकरूंना मोबदला देण्याबाबत कोणताही विचार केलेला नाही. त्यामुळे सर्व प्रकल्पग्रस्तांना मोबदला मिळत नाही, तोपर्यंत चौपदरीकरणाचे काम बंद पाडण्याचा निर्णय आजच्या सभेत घेण्यात आला. उद्या (ता. २३) शहरात ज्या ठिकाणी काम सुरू होईल, तेथे जाऊन काम बंद पाडण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com