मुंबई - गोवा नव्या महामार्गावरही अपघातांचा धोका कायम 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 डिसेंबर 2018

कणकवली - मुंबई - गोवा महामार्गाला थेट जोडल्या जाणाऱ्या रस्त्यांच्या ठिकाणी बॉक्‍सवेल किंवा अंडरपास न ठेवता लेव्हल क्रॉसिंग ठेवले आहेत. यात गावातून येणारी वाहने थेट महामार्गावरच येणार आहेत, त्यामुळे महामार्गाचे चौपदरीकरण होऊनही अपघातांचा धोका कायम राहणार आहे. 

कणकवली - मुंबई - गोवा महामार्गाला थेट जोडल्या जाणाऱ्या रस्त्यांच्या ठिकाणी बॉक्‍सवेल किंवा अंडरपास न ठेवता लेव्हल क्रॉसिंग ठेवले आहेत. यात गावातून येणारी वाहने थेट महामार्गावरच येणार आहेत, त्यामुळे महामार्गाचे चौपदरीकरण होऊनही अपघातांचा धोका कायम राहणार आहे. 

झाराप-पात्रादेवी हा भाग चौपदरीकरण झाल्यानंतर या मार्गाला गावातून येणारे रस्ते थेट जोडले. त्यामुळे गावातून येणारी वाहने महामार्गावर येऊन अनेकांना जीव गमवावा लागला आहे. इंदापूर - झाराप या महामार्ग चौपदरीकरण टप्प्यात हा धोका टाळला जाणार असल्याची ग्वाही तत्कालीन महामार्ग अधिकाऱ्यांनी दिली होती. महामार्ग चौपदरीकरणाचा त्या त्या गावातील आराखडा महामार्गालगतच्या ग्रामपंचायतींमध्ये ठेवला जाणार असल्याचेही सांगितले होते. 

प्रत्यक्षात कुठल्याच ग्रामपंचायतीमध्ये महामार्गाचा आराखडा ठेवला नाही. त्यामुळे त्या त्या गावातील नागरिकांनाही महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्यांवर अडंरपास, बॉक्‍सवेल असेल की थेट लेव्हल क्रॉंसिंग असेल याची कल्पना आली नाही. आता महामार्ग पूर्णत्वास जात असताना यातील धोके ग्रामस्थांना समजू लागले आहेत. त्यामुळे अंडरपास किंवा बॉक्‍सवेलसाठी आंदोलने होऊ लागली आहेत; मात्र चौपदरीकरणाचे काम अंतिम टप्प्यात असल्याने अंडरपास, बॉक्‍सवेलची कोणतीही नवी कामे काढू नयेत असा फतवाच महामार्ग विभागाने काढला आहे. 
 
नवीन कामे यापुढे नाहीत 
गावांना जोडणाऱ्या ठिकाणी अंडरपास किंवा बॉक्‍सवेल व्हावेत, यासाठी तरंदळे, हळवल, घावनळे, कसाल आदी ठिकाणी आंदोलने झाली; मात्र अंडरपास किंवा बॉक्‍सवेल करण्याचे ठोस आश्‍वासन अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेले नाही. महामार्ग विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पाठविलेल्या पत्रात नव्याने कुठेही अंडरपास किंवा बॉक्‍सवेल उभारणी शक्‍य नसल्याचे नमूद केले आहे. याखेरीज कुडाळ येथे उड्डाणपूल प्रस्तावित असून, त्यालाही अंतिम मान्यता मिळालेली नाही. 

Web Title: issue of Mumbai - Goa Highway fourtrack