मुंबई-गोवा चौपदरीकरणाला आला वेग

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण वेगाने सुरू झाले आहे. आरवली ते वाकेड या 90 किलोमीटर परिसरातील रुंदीकरणाला विरोध करणाऱ्या ठिकाणी प्रत्यक्ष जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी भेट देऊन त्यांच्या समस्या सोडविल्या व रस्ता रुंदीकरण मार्गी लावले.

आरवलीदरम्यान अडचण निर्माण झाली होती. आरवली येथे भवानी हॉटेल, हनुमान मंदिर तसेच मेडिकल स्टोअर्स या चौपदरीकरणात जात होते. मात्र त्याचा होणारा विरोध प्रत्यक्ष जिल्हाधिकारी सुनील चव्हाण तसेच राष्ट्रीय महामार्ग रत्नागिरी विभागाचे कार्यकारी अभियंता प्रमोद बनगोसावी, राष्ट्रीय महामार्ग उपविभाग रत्नागिरीचे उपविभागीय अभियंता मिलिंद मडकईकर, स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक श्रीराम खानविलकर आणि एमईपी कंपनीचे अधिकारी यांनी भेट दिली.

तत्काळ हे रुंदीकरण करा, असे आदेश दिल्यानंतर कामाला सुरवात झाली. वरिष्ठ लोकप्रतिनिधीचा व अधिकाऱ्यांचा दबाव पूर्णपणे बाजूला सारून हे रस्ता रुंदीकरण करण्याचे आदेशच जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याने तत्काळ काम सुरू झाले. मुंबई-गोवा महामार्गाचा प्रश्‍न अनेक ठिकाणी निकाली निघाला आहे. जिल्हाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली. रहिवासी, दुकानदारांचे प्रश्‍न, जमिनीचा मोबदला यावर तोडगा काढला. यामुळे महामार्ग लवकर पूर्ण होण्यास मदत होईल.

Web Title: issue of Mumbai - Goa Highway fourtrack