नाणार प्रकल्पाकडून ग्रामस्थांना दिलेल्या दिनदर्शिकेची होळी

नाणार प्रकल्पाकडून ग्रामस्थांना दिलेल्या दिनदर्शिकेची होळी

राजापूर - तालुक्‍यातील नाणार येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प अन्यत्र हलविण्यात येणार असल्याचे जोरदार चर्चिले जात आहे.  पण दुसरीकडे प्रकल्पग्रस्त गावांमध्ये कंपनीकडून पोष्टाद्वारे दिनदर्शिका पाठविण्यात आल्या आहेत. या दिनदर्शिकेची ग्रामस्थांनी होळी करून रिफायनरी प्रकल्प कायमचाच हद्दपार करा, अशी पुन्हा एकदा मागणी केली आहे.

नववर्षाच्या दिनदर्शिकेच्या माध्यमातून नववर्षाच्या शुभेच्छा देताना रिफायनरी प्रकल्पासंबंधित मनपरिवतर्तन करताना सकारात्मक विचारांचा पूल बांधण्याचा रिफायनरी कंपनीकडून सुरू असलेल्या प्रयत्नांना काहीसा तडा गेला आहे. 

तालुक्‍यातील नाणार भागामध्ये प्रस्तावित असलेल्या रिफायनरी प्रकल्पाला प्रकल्पग्रस्त भागातून जोरदार विरोध केला जात आहे. हा प्रकल्प येथून हद्दपार करण्यासाठी गेल्या दोन वर्षापासून प्रकल्पग्रस्तांकडून विविध प्रकारची आंदोलने छेडली जात आहेत. अशा स्थितीतही लोकांच्या विरोधानंतर शासनाकडून या प्रकल्पाची उभारणी रेटून नेली जात आहे.

एका बाजूला दिवसागणिक प्रकल्पविरोधाची धार अधिकच पेटत असताना गेल्या दोन दिवसांपासून तालुक्‍यातील रिफायनरी प्रकल्प रायगड येथे हलविला जात असल्याच्या चर्चांना चांगलाच ऊत आला आहे. मात्र, त्याबाबत ठोस आणि निश्‍चित माहिती अद्यापही पुढे आलेली नाही. 

या साऱ्या घडामोडीमध्ये मात्र, प्रकल्पाबाबत लोकांचे सकारात्मक मत बनविण्यासाठी रिफायनरी उभारणाऱ्या कंपनीकडून जोरदार प्रयत्न केले जात आहेत. त्यातून, कंपनीकडून प्रकल्पासाठी भूसंपादन केल्या जाणाऱ्या चौदा गावांमधील लोकांना पोष्टाद्वारे नव्या वर्षाची दिनदर्शिका (कॅलेंडर) पाठविली होती.

त्यातून, लोकांना नववर्षाच्या शुभेच्छांसह प्रकल्पासंबंधित सव्विस्तर माहिती देताना लोकांसोबत प्रकल्पासंबंधित सकारात्मक विचारांचा पूल बांधण्याचा प्रयत्न कंपनीकडून गेला होता. मात्र, लोकांनी आज प्रकल्पग्रस्त गावांमध्ये एकत्र या दिनदर्शिकांची होळी करत कंपनीचा मतपरिवर्तनाचा प्रयत्न हाणून पाडला आहे. यावेळी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com