Photo : इट्स केअर फॉर यु ; मंडणगडला उत्स्फूर्त प्रतिसाद...

सचिन माळी
रविवार, 22 मार्च 2020

कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात घोषित करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला मंडणगड तालुक्यातुन जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला.

मंडणगड (रत्नागिरी) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी संपूर्ण देशात घोषित करण्यात आलेल्या जनता कर्फ्यूला मंडणगड तालुक्यातुन जनतेचा उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. शहरात मंडणगड नगरपंचायतीच्या वतीने इट्स नॉट कर्फ्यु, इट्स केअर फॉर यु सांगत जनता कर्फ्युचे आरोग्याविषयी असणारे महत्व समजावून जनजागृतीचा नारा देण्यात आला. त्याला नागरिक, व्यापारी, वाहतूकदार यांनी पूर्णपणे बंद पाळून प्रतिसाद दिला.

नागरिक घरातून बाहेर न पडल्याने रस्त्यांवर शुकशूकाट होता. मंडणगडमध्ये जनता कर्फ्यू यशस्वी ठरल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील प्रशासकीय अधिकाऱ्यांनी जास्तीतजास्त खबरदारी घेतली. तहसिलदार नारायण वेंगुर्लेकर, पोलिस निरिक्षक सुदाम शिंदे, मुख्याधिकारी संतोष माळी, बाणकोट पोलिस ठाण्याचे पोलिस निरिक्षक उत्तम पिठे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.प्रभाकर भावठाणकर, एपीआय. सुशांत वराळे, ग्रामीण रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. आशिष शिरसे, गटविकास अधिकारी एम. दिघे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासकीय यंत्रणा राबविण्यात येत आहे.

मंडणगड: शहरातून बाणकोटकडे होणारा रस्त्यावर सामसूम

हेही वाचा- Photo : इचलकरंजीत त्यानंतर मात्र कोणी रस्त्यावर फिरकले नाही...

बीट एएसआय. एस.के.जाधव, शहाजी पवार, जी.एम.सय्यद, एएसआय. श्री.गोरे, वहातुक पोलिस आर.के.कारंडे यांनी शहरात चोख बंदोबस्त ठेवला होता. शहरात कर्फ्यूचे पालन करण्यासाठी मुख्याधिकारी संतोष माळी, नगराध्यक्षा आरती तलार, उपनगराध्यक्षा स्नेहल मांढरे, तसेच सर्व नगरसेवक यांनी कर्मचाऱ्यांनद्वारे दोन दिवसापुर्वीच पत्रके वाटून तसेच जनजागृती करून कर्फ्यू यशस्वी करण्यासाठी आवाहन केले होते.

.मंडणगड बस स्थानकात अशी पसरली शांतता

चिपळूणात कर्फ्यूला जनतेची संयमाने साथ...

२२ मार्च रोजी पहाटेपासूनच याची अंमलबजावणी सुरू झाली. एसटी बंद असल्याने बस स्थानक, बाजारपेठ, रिक्षा स्टँड, बाणकोट रोड, भिंगलोळी रस्ता, मुख्य चौक व शहरातील प्रमुख रस्त्यांवर शुकशुकाट होता. चौविस तास वर्दळ असणारे बस स्थानक ओस पडले. रस्ते निर्मनुष्य झाले. पोलीस व वैद्यकीय विभाग मात्र आपली जबाबदारी आणि कर्तव्य पार पाडण्यासाठी तत्पर होता.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It's Care for You Spontaneous response to Mandangad kokan marathi news