कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, संदेश सावंत यांना कारावास 

कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, संदेश सावंत यांना कारावास 

सिंधुदुर्गनगरी - वेंगुर्ले पालिकेच्या 2011 मधील सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान झालेल्या राजकीय राडाप्रकरणी माजी आमदार परशुराम ऊर्फ जीजी उपरकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या आरोपाखाली कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे व माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संदेश ऊर्फ गोट्या सावंत यांना आज जिल्हा व सत्र न्यायाधीश एकचे प्रकाश कदम यांनी आरोपींना दोषी ठरवत सात वर्षे सश्रम कारावास आणि प्रत्येकी 31 हजार 500 रुपये दंडांची शिक्षा सुनावली. उर्वरित 44 जणांची निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील संदेश तायशेटे यांनी काम पाहिले. 

याबाबतची माहिती अशी - 2011 मध्ये वेंगुर्ले पालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक कालावधीत 5 डिसेंबर 2011 ला रात्री अकराच्या सुमारास उपरकर यांचे अंगरक्षक मारुती शांताराम साखरे आणि माजी आमदार उपरकर हे वेंगुर्ले सुंदर भाटले येथे शिवसेना कार्यालयात बसले होते. यावेळी संशयित आरोपी समीर नलावडे, संदेश ऊर्फ गोट्या सावंत, संजय मालणकर, सुरेंद्र कोदे, संजय कामतेकर, नागेश मोर्ये, मिलिंद मेस्त्री, जावेद शेख, संदेश सावंत, अमित सावंत, उपेंद्र पाटकर, संदीप मेस्त्री, (सर्व रा. कणकवली), तुषार रासम (रा. नेरळ कर्जत), सुशांत पांगम, हुसेन मकानदार, गुरुनाथ सावंत, ज्ञानेश्‍वर सावंत, नारायण गायतोंडे, अक्रम खान, विलास बांदेकर (सर्व रा. बांदा), हेमंत ऊर्फ काका कुडाळकर, संजय पडते, साईनाथ म्हाडदळकर, आनंद गावडे, सर्फराज नाईक, केशव नारकर, रूपेश पावसकर, गणू ऊर्फ दाजी गोलम (सर्व रा. कुडाळ), मनोज नाईक, दत्ताराम कवठणकर, तौकीर शेख, अतुल पेंढारकर, सच्चिदानंद परब, दत्ताराम सावंत (सर्व रा. सावंतवाडी), विक्रम गावडे, मनीष दळवी, अनंत केळुसकर, आत्माराम सोपटे, गिरजोज फर्नांडिस, प्रसन्ना देसाई, तुषार साळगावकर, विष्णुदास कुबल, संदेश निकम, यशवंत परब, कन्हैया गावडे (सर्व रा. वेंगुर्ले), राकेश परब (मालवण) हे बेकायदा जमावाने हातात लाठ्या-काठ्या आणि सोड्याच्या बाटल्या घेऊन येत उपरकर यांच्यावर प्राणघातक हल्ला केला होता.

कार्यालयातील साहित्याची आणि कार्यालयाबाहेरील वाहनांची तोडफोड करून नुकसान केले होते. यावेळी साखरे यांनी माजी आमदार उपरकर यांचा जीव वाचावा, यासाठी सरकारी पिस्तुलातून दोन राउंड फायर केले होते. याबाबतची फिर्याद मारुती साखरे यांनी वेंगुर्ले पोलिस ठाण्यात दिली होती. त्यानुसार वरील 47 जणांवर वेंगुर्ला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 

या खटल्याच्या कामी सरकारी पक्षाच्या वतीने प्रथम सहायक सरकारी अभियोक्ता सुधीर भणगे यांनी साक्षीदार तपासले, तर तत्कालीन सरकारी वकील ऍड. सूर्यकांत खानोलकर यांनी युक्तिवाद केला. आजच्या दिवशी विद्यमान सरकारी वकील ऍड. संदेश तायशेटे यांनी युक्तिवाद केला. 

सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य 
या प्रकरणी आज न्यायालयात झालेल्या सुनावणीत सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य मानत आरोपी नलावडे आणि सावंत यांना न्यायालयाने दोषी ठरवत विविध कलमाखाली सात वर्षे सश्रम कारावास व 15 हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास 30 दिवस साधी कैद अशी शिक्षा सुनावली. उर्वरित 44 जणांची निर्दोष मुक्तता केली. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com