जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प पूर्ण होणारच- डॉ. काकोडकर

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 22 ऑक्टोबर 2016

सावर्डे- राज्याच्या अथवा कोकणच्या विकासात भर घालणारा राजापूरचा अणुऊर्जा प्रकल्प अयशस्वी ठरणार नाही. त्याची पूर्तता होणारच. आजघडीला अनेक अडचणींतून भूसंपादनाचे काम झाले आहे. बांधकामाचा खर्च वाया गेला असे म्हणता येणार नाही, असे प्रतिपादन अणुऊर्जा शास्त्रज्ञ, पद्मभूषण डॉ. अनिल काकोडकर यांनी केले. ते सह्याद्री शिक्षण संस्थेच्या अन्नतंत्रज्ञान महाविद्यालयाच्या वायनरी प्रकल्पाच्या उद्‌घाटनास आले असताना पत्रकारांशी बोलत होते.

अणुऊर्जा प्रकल्प पूर्णत्वास जाईल तेव्हापासून प्रकल्पाचा खर्च गृहीत धरला जाईल. जैतापूरचा अणुऊर्जा प्रकल्प आणि रिफायनरी प्रकल्पाबाबत बोलताना ते म्हणाले, "मोठ्या प्रकल्पांची निर्मिती होत असताना त्यामध्ये अंतर असणे गरजेचे आहे. दोन्ही प्रकल्प एकत्र आल्यास पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्‍यता असते. कोकणचा विकास साधायचा असेल तर प्रकल्प होणे गरजेचे आहे. कोकणातील पिकांवर प्रक्रिया केल्यास आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कोकणातील उत्पादनाला चांगला दर्जा मिळू शकेल. त्यासाठी तंत्रज्ञान अंगीकारले पाहिजे.‘

जैतापूर प्रकल्पामध्ये अरेवा कंपनीने मोठी गुंतवणूक केली आहे. ती तोट्यात आली असल्याचे बोलले जात आहे; मात्र फ्रान्सअंतर्गत झालेले बदल व घडामोडींतून अरेवा कंपनीचे ईडीएफ कंपनीत रूपांतर झाले असून या कंपनीकडे पॉवर सेक्‍टरची जबाबदारी देण्यात आली आहे. कोकणात पिकणारी फळे, मासे व अन्नाचे अतिरिक्त उत्पादन झाल्यास त्याची नासाडी होऊ शकते. छोटे प्रक्रिया प्रकल्प झाल्यास ती नासाडी थांबवून आर्थिक घडी उंचावता येते. कोकणचा हापूस खरेदी करताना दहावेळा विचार केला जातो. त्याला निकष लावले जातात. त्याचा दर्जा उच्चतम करण्यासाठी त्यावर प्रक्रिया करून ब्रॅंडिंग केल्यास चांगले मूल्य मिळू शकते. अन्न तंत्रज्ञानावर प्रक्रिया करणारे प्रकल्प देशात वाढणे त्यासाठी गरजेचे आहे. वायनरी कोकणात सुरू झाल्यास रोजगारनिर्मिती होऊ शकते. नैसर्गिक साधन सामग्रीचा वापर करून सायन्स व टेक्‍नॉलॉजीच्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जात आहेत, असेही त्यांनी सांगितले.

Web Title: Jaitapur nuclear power plant through honaraca Dr. Kakodkar