जांभरूणमध्ये नदीतील गाळ काढणे सुरू

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 एप्रिल 2017

रत्नागिरी - येथील जाणीव फाउंडेशनने दत्तक घेतलेल्या जांभरूण गावात हनुमान जयंतीपासून नदीतील गाळ काढण्याच्या कामाला सुरवात झाली. तसेच ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त सहभागाने स्वच्छता मोहीमही राबविण्यास प्रारंभ झाला. प्रत्येक वाडीत ग्रामस्थांनी घराजवळील परिसर व सार्वजनिक जागेत सकाळपासून पाच तास सफाई करण्यात आली. यामध्ये प्रत्येक वाडीमधून ५० ते ६० ग्रामस्थ उपस्थित होते.

जाणिवने जांभरूण गाव सर्वांगीण विकासासाठी दत्तक घेतले असून तत्काळ कामाला सुरवात केली. ग्रामस्थांच्या शंभर टक्के सहकार्यातून विकासकामे केली जाणार आहेत. मुंबईतील जलप्रतिष्ठानचे अध्यक्ष उल्हास परांजपे आणि जांभरूणच्या सरपंच सुनयना थेराडे यांनी श्रीफळ वाढवून गाळ काढण्याच्या कामाला सुरवात केली. जेसीबी मशीनद्वारे नदीतील गाळ काढला जात असून ग्रामस्थांनीही दगड, माती गोळा करण्यास मदत करीत आहेत. दिवसातून दोन वेळा हे काम केले जात आहे.

या वेळी जाणीव फाउंडेशनचे अध्यक्ष महेश गर्दे यांनी नदीतील गाळ उपसण्याचे काम कोणत्या टप्प्यात होणार आहे, हे सांगितले. गावातील नदी सुमारे तीन किलोमीटर लांब असून त्यातील एक कि.मी.चे काम पहिल्या टप्प्यात होणार असल्याचे त्यांनी सांगितले. श्री. परांजपे यांनी पावसाच्या पाण्याचे नियोजन कसे करावे, याविषयी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. त्यानंतर ग्रामस्थांच्या सहकार्याने व जेसीबीच्या माध्यमातून गाळ उपसण्यास सुरवात करण्यात आली.

या वेळी सरपंच थेराडे, उपसरपंच विनोद साळुंके, सदस्य स्वप्नील पाथरे, ऋणाली कुळ्ये, बाळकाका शितूत, शशांक शिंदे, आप्पा शितूत, वसंत थेराडे, अभय शितूत, अमर पाथरे, विजय शिंदे, राजेश पाथरे, अरुण शिंदे, शशांक 
शितूत, दिप्तेश थेराडे, विलास मांजरेकर, जितेंद्र थेराडे, अनंत कुळ्ये, गौतम सावंत, कृष्णा धोपट, बंधू कुळ्ये, दत्ताराम थेराडे, अनंत थेराडे, दिवाकर सावंत, सदाशिव सावंत, अंजली शितूत, माधव शितूत, ग्रामसेवक उमेश साळवी व २०० ग्रामस्थ, विद्यार्थी, जाणीवचे उमेश महामुनी, संजय शिंदे, सुनील बेंडखळे, अमित येदरे आदी सदस्य उपस्थित होते.

Web Title: jambharun continue to rise in the river mud