जांबुर्डेत स्कूलबसवर आदळून दुचाकीस्वार ठार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 28 नोव्हेंबर 2016

खेड - मुंबई-गोवा महामार्गावरील जांबुर्डे गावाजवळ भरधाव दुचाकी स्कूलबसवर आदळून झालेल्या अपघातात एक जागीच ठार झाला. दुचाकीवर मागे बसलेला गंभीर जखमी झाला. अपघात आज सकाळी अकराच्या सुमारास झाला.

खेड - मुंबई-गोवा महामार्गावरील जांबुर्डे गावाजवळ भरधाव दुचाकी स्कूलबसवर आदळून झालेल्या अपघातात एक जागीच ठार झाला. दुचाकीवर मागे बसलेला गंभीर जखमी झाला. अपघात आज सकाळी अकराच्या सुमारास झाला.

सुरेश कुमार दास (रा. घाणेखुंट) दुचाकी (एमएच-12-सीएक्‍स-378) घेऊन लोटेहून भरधाव खेडकडे येत होता. जांबुर्डेजवळ वळणावर त्याचा दुचाकीवरील ताबा सुटला. दुचाकी समोरून येणाऱ्या स्कूलबसवर आदळली. स्कूल बसचालकाने दुचाकीस्वाराला वाचविण्यासाठी प्रयत्न केले; परंतु ते यशस्वी झाले नाहीत. अपघातात जखमी झालेल्या युवकाचे नाव राजेश दास आहे. अपघातात सुरेश जागीच ठार झाला, तर दास गंभीर जखमी झाला. त्याला कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले.

Web Title: jamburde school bus accident