जव्हारकरांनी केला बहाद्दुर जवान आणि अधिकाऱ्याचा सत्कार

भगवान खैरनार
बुधवार, 20 जून 2018

मोखाडा : जव्हार ही ऐतिहासिक भूमी आहे. येथे ऐतिहासिक परंपरेबरोबरच, सामाजिक आणि सांस्कृतिक परंपरा ही जपली गेली आहे. तालुक्यातील अतिदुर्गम भागातील रामदास भोगाडे या जवानाने देशाचे रक्षण करताना आपले दोन्ही पाय गमावले तर कल्पेश जाधव याने परिस्थिती वर मात करून, राज्यात सर्वात कमी वयात राज्य सेवा परिक्षेत ऊत्तीर्ण होऊन, कौशल्य विकास प्रकल्प संचालक म्हणून कार्यरत झाला आहे. या दोन्ही कर्तबगारांचा सह्रदय सत्कार सिडकोचे अतिरिक्त आयुक्त अशोक शिंगाडे यांच्या हस्ते करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे आयोजन जव्हार चे जेष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई वैद्य यांनी केले होते. 

जव्हार ची ओळख राज्यात ऐतिहासिक भूमी म्हणून आहे. त्याचबरोबर जव्हार ला सांस्कृतिक परंपरा देखील लाभली आहे. जव्हार च्या भूमीला साजेशी कामगिरी, तालुक्यातील अतिदुर्गम भागातील रामदास भोगाडे या जवानाने आणि कल्पेश जाधव अधिकाऱ्याने केली आहे. भारतीय सैन्यात कार्यरत असताना रामदास भोगाडे याला नक्षली भागात नेमण्यात आले होते. या भागात तिस जवानांचा चमू देशाचे रक्षण करत होता. भुसुरूंग स्फोटात रामदास भोगाडे ने आपले दोन्ही पाय गमावले आहेत. सर्वात पुढे राहून त्याने, आपल्या सर्व सहकार्याचे प्राण वाचविले आहेत.

तर कल्पेश जाधव या युवकाने, दुर्गम भागात शिक्षण घेऊन, प्रतिकूल परिस्थिती वर मात करून राज्य सेवा परिक्षेत, कौशल्य विकास प्रकल्प संचालक ही परिक्षा उत्तीर्ण झाला आहे. विशेष बाब म्हणजे राज्यात सर्वात कमी वयात, राज्य सेवा परिक्षा ऊत्तीर्ण होण्याचा बहुमान त्याने पटकावला आहे.

या दोन्ही युवकांच्या कामगिरीने राज्यात जव्हार चे नावलौकिक झाले आहे. या दोन्ही युवकांच्या सत्काराचे आयोजन जव्हारचे ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी भाई वैद्य यांनी केले होते. भाई वैद्य यांनी या दोन्ही युवकांच्या भरीव कामगिरी चे तोंडभरून कौतुक केले आहे. यावेळी सत्काराला उत्तर देताना, या दोन्ही सत्कारार्थींनी आपले अनुभव कथन केले. त्यावेळी जव्हार कर भारावून गेले होते. या सत्कार सोहळ्यास अप्परजिल्हाधिकारी श्रीधर दुबे पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रामदास मराड, जव्हारचे नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल, माजी नगराध्यक्ष दिनेश भट, रियाज मनियार, हर्षद मेधपुरिया, बळवंत गावीत यांसह जव्हार व परिसरातील नागरिक मोठय़ा संख्येने उपस्थित होते. 

Web Title: Javarkar people honor for brave Soldier and officer