शिवसेनेचे वैभववाडीतील रावराणे स्वाभिमानमध्ये 

वैभववाडी - शिवसेनेचे कणकवली विधानसभा मतदारसंघ प्रमुख जयेंद्र रावराणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह स्वाभिमान पक्षाचा झेंडा हाती घेतला. 
वैभववाडी - शिवसेनेचे कणकवली विधानसभा मतदारसंघ प्रमुख जयेंद्र रावराणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह स्वाभिमान पक्षाचा झेंडा हाती घेतला. 

वैभववाडी - शिवसेनेचे कणकवली विधानसभा मतदारसंघ प्रमुख जयेंद्र रावराणे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. याशिवाय तालुक्‍यातील मनसे आणि भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्वाभिमान पक्षाचा झेंडा हाती घेतला आहे. 

येथील अर्जुन रावराणे विद्यालयाच्या पटागंणात झालेल्या सभेत श्री. रावराणे यांनी संस्थापक अध्यक्ष खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. त्यांच्यासोबत माजी पंचायत समिती सदस्य बाळा कदम, विकास कोलते, शरद कोलते, उत्तम कोलते, सचिन कोलते, ग्रामपंचायत सदस्य रामचंद्र शिवगण यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यानी प्रवेश केला. मनसेचे माजी तालुका सहसंपर्क प्रमुख सुर्यकांत शेट्ये, उपाध्यक्ष संजय पाटील, विभागीय अध्यक्ष गुरूनाथ राणे यांच्यासह असंख्य 

वाभवेचे माजी सरपंच सदानंद माईणकर, केतन सावंत, कल्पेश कदम, आदित्य तावडे यांच्यासह 20 कार्यकर्त्यांनी स्वाभिमानमध्ये प्रवेश केला. भाजप युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष वैभव रावराणे, समाधान काडगे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला. कालच्या सभेत शिवसेना, भाजप आणि मनसेच्या अनेक कार्यकर्त्यानी स्वाभिमान पक्षात प्रवेश केला. 

शिवसेनेत राणेंचा गुप्तहेर होतो.... 

प्रवेशानतंर जयेंद्र रावराणे यांनी आपण कधीही नारायण राणेंना सोडून कुठेही गेलेलो नाही. त्यांच्याशी कायम एकनिष्ठ राहीलो. शिवसेनेत राणेंचा गुप्तहेर म्हणुन काम करीत होतो. त्यांनी मला माहिती काढायला पाठविले होते, असे सांगताच एकच हशा पिकला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com