राष्ट्रवादी काँग्रेसच्या चिपळूण तालुकाध्यक्षपदी जयंद्रथ खताते

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 नोव्हेंबर 2018

चिपळूण - राष्ट्रवादी काँग्रेसची जंबो तालुका कार्यकारिणी जाहीर झाली. तालुकाध्यक्षपदी जयंद्रथ खताते यांची फेरनिवड झाली. सहा उपाध्यक्ष, दोन सरचिटणीस सहा चिटणीस, बारा सल्लागार व ४७ सदस्यांचा कार्यकारिणीत समावेश आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांना योग्य न्याय मिळाल्याची माहिती माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम, तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते यांनी पत्रकार परिषदेत दिली.

शहरातील पाग महिला विद्यालयात राष्ट्रवादीची तालुका कार्यकारिणी जाहीर केली. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष शेखर निकम, महिला जिल्हाध्यक्षा चित्राताई चव्हाण, तालुकाध्यक्षा जागृती शिंदे, तालुकाध्यक्ष जयंद्रथ खताते, विधानसभा क्षेत्राध्यक्ष दादा साळवी, माजी नगराध्यक्ष सुचयअण्णा रेडीज उपस्थित होते. 

कार्यकारिणी अशी- उपाध्यक्ष- पांडुरंग माळी (मालदोली), सूर्यकांत खेतले (मुंढे), दत्ताराम गुजर (कोसबी), रमेश घाग (नायशी), संदेश गोरीवले (वालोपे), दत्ताराम मिरगल (खेर्डी), सरचिटणीस- रमेश राणे (कोळकेवाडी), राजन कुडाळकर (चिपळूण), चिटणीस-अरुण चिले (पाचाड), संजय जाधव (दळवटणे), प्रवीण साळवी (असुर्डे), कमलेश साळवी (मांडकी), सत्यवान मोरे (ओझरवाडी),  मंदार देसाई (कापसाळ), सोशल मीडिया तालुकाध्यक्ष-आशफाक चौगुले (खेर्डी), चिपळूण-संगमेश्‍वर मतदारसंघ संपर्कप्रमुख-विजय गुजर, खजिनदार-जयराम शिंदे (कादवड), सल्लागार-पूजा निकम (सावर्डे), नंदकुमार शिर्के (चिवेली), अशोकराव कदम (कोळकेवाडी), बळीराम शिंदे (कादवड), सुरेश खलपे (कळबंट), विजय खेडेकर (कुटरे), सय्यद खलपे (सावर्डे), राजाभाऊ चाळके (चिंचघरी), किसान माटे (कामथे), मानसींग महाडीक (ढोक्रवली), सीताराम घाडगे (दळवटणे). विद्यमान जिल्हा परिषद व पंचायत समिती सदस्य, सर्व सेलचे अध्यक्ष व सरपंच हे कार्यकारिणीचे पदसिद्ध सदस्य आहेत.

Web Title: Jayendrarath Khatate for the President of Chiplun Taluk of NCP

टॅग्स