"जीवनरेखा एक्‍स्प्रेस' 17 पर्यंत रत्नागिरीत 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 29 मार्च 2017

रत्नागिरी - कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वांनी पक्षभेद विसरून एकत्र आले पाहिजे. यापूर्वी कोकणला न्याय मिळालेला नाही. यापुढे अशी वेळ येणार नाही, यादृष्टीने प्रयत्न करू या. जीवनरेखा एक्‍स्प्रेसच्या निमित्ताने आरोग्यदायी सेवा रत्नागिरीत मोफत उपलब्ध करून दिली आहे. त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज केले. आठ बोगींचे हे रेल्वेचे फिरते हॉस्पिटलच आहे. 29 मार्च ते 17 एप्रिल या कालावधीत या हॉस्पिटलचा लाभ रुग्णांना घेता येणार आहे. येत्या वीस दिवसांत दहा हजार रुग्णांना याचा लाभ मिळेल, असे नियोजन करण्यात आले आहे. 

आदित्य बिर्ला फायनान्शिअल सर्व्हिसेसद्वारे महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने इम्पॅक्‍ट इंडिया फाऊंडेशन संचलित लाईफ लाईन एक्‍स्प्रेसचे मंगळवारी रत्नागिरीत आगमन झाले. रत्नागिरी रेल्वेस्थानकात रेल्वेमंत्री श्री. प्रभू यांनी रिमोट कंट्रोलद्वारे दिल्लीतून याचे उद्‌घाटन केले. 

ही रेल्वे म्हणजे हॉस्पिटलच आहे. यामध्ये सर्व प्रकारच्या अत्याधुनिक उपचार पद्धतींचा नागरिकांना लाभ मिळेल. या रेल्वेची निर्मिती 1991 ला झाली. त्यात आठ बोगी आहेत. त्यातील दोन बोगींमध्ये शस्त्रक्रिया करण्याची व्यवस्था आहे. एका बोगीमध्ये एकाच वेळी पाच जणांवर शस्त्रकिया करता येईल. डोळ्यांच्या तपासणीसाठी अत्याधुनिक यंत्रणाही आहे. ऑपरेशनला जाण्यापूर्वी निर्जंतुकीकरणासाठी एका डब्यामध्ये यंत्रणा आहे. गेल्या 25 वर्षांमध्ये 1 लाख 20 हजार रुग्णांनी याचा लाभ घेतला आहे. आरोग्य सेवा कार्यक्रमांतर्गत तपासणी, उपचार, शस्त्रक्रिया, वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला येथे दिला जाणार आहे. कॅन्सर, डोळे, हाडाच्या शस्त्रक्रियेसाठी सुमारे 25 तज्ज्ञ वैद्यकिय अधिकाऱ्यांचे पथक उद्यापासून कार्यरत राहणार आहे. या एक्‍स्प्रेसबरोबर 15 कर्मचारी आहेत. 

या कार्यक्रमाला आमदार उदय सामंत, जिल्हाधिकारी प्रदीप पी., मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बी. डी. आरसूळकर, कोकण विभागीय व्यवस्थापक बाळासाहेब निकम, प्रकल्प व्यवस्थापक डॉ. यागनिक वझा उपस्थित होते. आमदार सामंत म्हणाले, ""कोकणातील नागरिकांसाठी ही आरोग्य सेवा प्रथमच मिळाली आहे. अशा प्रकारच्या उपक्रमांसाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे.'' 

रुग्ण तपासणीचे वेळापत्रक 
रुग्णांच्या तपासणीसाठी रेल्वेमध्ये पुरेशी जागा नाही. त्यामुळे जिल्हा शासकीय रुग्णालयात तपासणी शिबिर घेण्यात येणार आहे. शस्त्रक्रियेसाठी योग्य किंवा गंभीर असलेल्यांना रुग्णवाहिकेतून रेल्वेस्थानकावर 8 नंबरच्या ट्रॅकवरील जीवनरेखा एक्‍स्प्रेसमध्ये नेण्यात येईल. विविध रोगांच्या तपासणीचे वेळापत्रक निश्‍चित केले आहे. 30 मार्च ते 12 एप्रिल या कालावधीत स्त्री रोग तपासणी व उपचार, तोंडाच्या कर्करोगाचे तपासणी व उपचार 31 मार्च ते 2 एप्रिल - फिटस्‌ तपासणी व उपचार, 3 ते 9 एप्रिल, दंत तपासणी व उपचार आणि 8 ते 14 एप्रिल - कुटुंब नियोजन. लाईफ लाईन एक्‍स्प्रेसमध्ये सकाळी 9 ते 5 या वेळेत निदानोत्तर उपचार होणार आहे. डोळ्यांची तपासणी 29 मार्च ते 2 एप्रिल मोतिबिंदू शस्त्रक्रिया, 30 मार्च ते 6 एप्रिल फाटलेले ओठ आणि भाजलेल्या जखमांची तपासणी व उपचार केले जाणार आहेत. 

Web Title: jeevanrekha express