ज्वेलर्सच्या मालकाने दुकानाला कुलुप लावून काढला पळ

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

रसायनी पोलिस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रसाळ याने हॉलमार्क करण्याकरिता विश्वासाने आरोपीकडे मंगळसुत्र, कानातील बुटी, ब्रेसलेट हे सोन्याचे आठ तोळे आणि सहा ग्रॅम वजनाचे दागिने दिले होते. ​

रसायनी - वासांबे मोहोपाडा येथील बाजार पेठेतील न्यु अंबिका ज्वेलर्स दुकान बंद करून मोहनसिंग केशरसिंग दसाना मुळ राहणार बोरडा, राजस्थान हा पसार झाला आहे. दरम्यान पळून जाताना मधुकर गोपाळ रसाळ राहणार नवीन पोसरी, मोहोपाडा यांचे दोन लाख पासष्ट हजार रुपये किंमतीचे दागिने परत न केल्याने रसायनी पोलिस ठाण्यात मोहनसिंग दसाना यांच्या विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

रसायनी पोलिस सुत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रसाळ याने हॉलमार्क करण्याकरिता विश्वासाने आरोपीकडे मंगळसुत्र, कानातील बुटी, ब्रेसलेट हे सोन्याचे आठ तोळे आणि सहा ग्रॅम वजनाचे दागिने दिले होते. वारंवार मागणी करून सुध्दा त्याने टाळाटाळ केली. तर दुकानाला कुलूप लावुन पळून गेला असल्याने रसाळ यांनी पोलिस ठाण्यात मोहनसिंग याने फसवणुक केली असल्याची तक्रार दाखल केली आहे. अधिक तापस पोलिस निरीक्षक आशोक जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Web Title: The jewelers owner locked the shop and fled