160 कामगार आले रस्त्यावर ; शंभर टक्के पगाराची मागणी, पण कंपनी देेते एवढेच....

मुजफ्फर खान | Friday, 10 July 2020

. काही कंपन्यांनी कामगारांना ब्रेक दिला आहे तर काहींनी कामगारांच्या वेतनामध्ये कपात केली आहे.  

चिपळूण (रत्नागिरी) : गाणे खडपोली औद्योगिक वसाहतीमधील जेके तलबोट या कंपनीतील कामगारांनी शंभर टक्के पगारासाठी संप पुकारला आहे. कंपनीतील 160 कामगार गुरुवारी दुपारपासून संपावर आहेत.

कोरोनाच्या परिस्थितीमध्ये औद्योगिक क्षेत्राला सर्वाधिक फटका बसला आहे. कंपनीच्या उत्पादनाला मागणी नसल्यामुळे अनेक कंपन्यांचे उत्पादन बंद आहेत. काही कंपन्यांनी कामगारांना ब्रेक दिला आहे तर काहींनी कामगारांच्या वेतनामध्ये कपात केली आहे. जेके फाइल्स अँड टूल्स आणि जे के तलाबोट या कंपन्यांमध्ये तयार होणारे फाइल्स ड्रील्स आणि इतर उत्पादन 80 टक्के परदेशात पाठवले जाते परंतु आंतरराष्ट्रीय सीमा बंद असल्यामुळे कंपनीच्या मालाला सध्या मागणी नाही. त्यामुळे  जेके फाइल्स या कंपनीतील कामगारांना व्यवस्थापनाने मार्च 2021 पर्यंत 50 टक्के वेतन देण्याचा निर्णय घेतला होता.

हेही वाचा- जगबुडीने ओलांडली इशारा पातळी : कोकणात पावसाचा जोर वाढला... -

जेके तलबोट कंपनीचे कामगार संपावर... ​

कामगारांच्या युनियनने त्याला विरोध केला त्यामुळे 80 टक्के पगार देण्याचा निर्णय झाला आहे. तो जेके फाइल्स अँण्ड टूल्सच्या ४५० कामगारांनी मान्य केला. परंतु जेके तलाबोट च्या कामगारांनी 80 टक्के पगाराला विरोध केला आहे. जेके तलाबोट च्या उत्पादनाला मागणी आहे कंपनीचे सर्व व्यवहार सुरळीत सुरू आहेत मग आम्हाला ऐंशी टक्के पगार का असे सांगत कंपनीच्या कामगारांनी शंभर टक्के पगाराची मागणी केली गुरुवारी दुपारपर्यंत कामगारांच्या बँक खात्यामध्ये शंभर टक्के पगार जमा न झाल्यामुळे कंपनीचे कामगार संपावर गेले आहेत.

हेही वाचा- काही सुखद -  कोरोनाचे संकट ओळखून यांनी मास्क विक्रीतून  मिळवले 3 लाखांहून अधिक रुपये...... -

कंपनीतील कामगारांचे प्रतिनिधी आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये आज सकाळपासून बोलणे सुरू होते त्यामुळे व्यवस्थापन आणि कामगार प्रतिनिधी यांनी यासंदर्भात बोलण्यास नकार दिला चर्चा फिस्कटली तर बोलू असे काही कामगारांनी सकाळला सांगितले.

संपादन - अर्चना बनगे