`त्यांना` गोव्यात पुन्हा नोकरीची संधी 

Job Opportunities For Who Residence In Goa CM Pramod Sawant Comment
Job Opportunities For Who Residence In Goa CM Pramod Sawant Comment

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - गोव्यात निवासी सोय असणाऱ्यांना  सिंधुदुर्गातील युवकांना तातडीने नोकरीची संधी दिली जाईल. निवासी सोय नसणाऱ्यांबाबत 1 जूनपर्यंत निर्णय घेतला जाईल, असे आश्‍वासन गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिले. याबाबत सिंधुदुर्गचे माजी पालकमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी श्री. सावंत यांच्याशी फोनवरून चर्चा केली. यावेळी ही माहिती दिली. 

गोव्याचे उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांच्या समन्वयातून मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याशी आमदार दीपक केसरकर यांनी आज चर्चा केली. सिंधुदुर्गातील अनेक तरुण तरुणी गोव्यात नोकरीला होते. कोरोनामुळे त्यांना नोकरी सोडावी लागली. त्यामुळे पुन्हा नोकरी सामावून घेण्याबाबत केसरकर यांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची चर्चा करून विनंती केली. गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत म्हणाले, ""गोव्यात राहण्याची सोय आहे अशा तरुण-तरुणींना पासेस दिले जातील आणि नोकरी सामावून घेतली जाईल. राहण्याची सोय नाही आणि ये-जा करून सहभाग घेणार आहेत त्यांच्या बाबतीत 1 जूनला निर्णय घेण्यात येईल.'' 

राज्यात राहण्याची सोय असणाऱ्या आणि पुर्वी नोकरी करणाऱ्या सर्व तरुण-तरुणींनी पासेस मिळवण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन आमदार केसरकर यांनी केले. मुंबईमधून काही रूग्ण औषधे आणत होते. त्यांना गोवा राज्यातून औषधे उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव तहसीलदार राजाराम म्हात्रे यांनी ठेवला होता त्याबद्दल मुख्यमंत्री सावंत यांच्याशी चर्चा केली, असे  केसरकर म्हणाले. 

नॉर्थ गोवा अधिकारी यांच्याशी जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी के. मंजूलक्ष्मी यांनी चर्चा करून प्रस्ताव सादर करावा असे ठरले. जिल्हाधिकारी मंजुलक्ष्मी यांना प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. गोव्यात औषधे उपलब्ध करून देण्याची जबाबदारी एका मेडिकल स्टोअर्सवर देण्यात येणार आहे, असे तहसीलदार म्हात्रे यांनी आपणास सांगितले होते, असेही आमदार केसरकर यांनी सांगितले. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com