पत्रकार भालचंद्र दिवाडकर यांचे निधन

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 फेब्रुवारी 2019

चिपळूण - येथील ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक भालचंद्र दिवाडकर (वय ६३) यांचे मुंबईत निधन झाले. ब्रेनट्युमरच्या आजारामुळे ते त्रस्त होते. मुंबईतील कोकीलाबेन रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. काल सायंकाळी सात वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. 

दिवाडकर यांच्या जाण्याने तर्कशुद्ध विचार आणि बुद्धिनिष्ठ प्रतिपाद करणारा पत्रकार गेल्याची प्रतिक्रिया समाजातून उमटत आहे. चौफेर वाचन, व्यासंगी वृत्ती आणि शैलीदार लिखाणामुळे ते प्रसिद्ध होते. पत्नी व मुलगीच्या निधनानंतर वैयक्तिक आयुष्यात दुःखाचे डोंगर कोसळूनसुद्धा ते जिद्दीने उभे राहिले. त्यांच्या शब्दाला कोकणच्या मातीची बांधिलकी होती. शैलीदार लेखणीतून ते वाचकांशी सतत भेटत होते.

लेखणीतून ते कोकणच्या विकासावर स्पष्ट भूमिका मांडायचे. त्यांनी नेहमी कोकणच्या विकासाची दिशा दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. विविध विषयांवर त्यांनी हजारो लेख लिहिले आणि व्याख्याने दिली आहेत. महाराष्ट्र शासन व राज्यातील अनेक संस्थांनी त्यांना विविध पुरस्काराने गौरविले आहे. रविवार (ता. १७) सकाळी १० ते ११ या दरम्यान त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. 

भालचंद्र दिवाडकर उत्तम लेखक आणि विचारवंत होते. त्यांच्या निधनामुळे साक्षेपी संपादक हरपला आहे. 
- ॲड. विलास पाटणे,
रत्नागिरी

Web Title: Journalist Bhalchandra Diwadkar passes away